Oscars 2024 John Cena Viral Video: हॉलिवूडच नव्हे तर, जगभरातील मनोरंजन विश्वातील अतिशय प्रतिष्ठेचा असा ‘ऑस्कर २०२४’ हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. दरवर्षी ‘ऑस्कर’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. अनेक वेळा ऑस्कर पुरस्काराच्या मंचावर काही विचित्र गोष्टी घडल्या आहेत, ज्यांची चर्चा जगभरात झाली आहे. असाच काहीसा प्रकार आज जाहीर झालेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातही घडला आहे. ऑस्कर २०२४ पुरस्कार सोहळ्यादरम्यान कुस्तीपटू आणि हॉलिवूड अभिनेता जॉन सीना सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार देण्यासाठी चक्क नग्न अवस्थेत मंचावर पोहोचला होता. जॉन सीनाची ही न्यूड एन्ट्री यंदाच्या ऑस्करमध्ये चर्चेत आली आहे.
‘ऑस्कर २०२४’ या सोहळ्यातील व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, होस्ट जिमी किमेल याने जॉन सीनाला सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार श्रेणीमध्ये पुरस्कार सादर करण्यासाठी आमंत्रित केल्याचे दिसत आहे. इतकेच नाही तर, सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार देणारी व्यक्ती स्वतःच कपड्यांशिवाय आली तर... असे म्हणत त्याने काही संकेतही दिले होते. मात्र, जॉन सीना कपड्यांशिवाय बाहेर मंचावर येण्यास कचरत होता. मात्र, ऑस्कर २०२४चा होस्ट किमेलने मन धरणी केल्यानंतर जॉन सीना स्टेजवर पोहोचला. यानंतर त्याने सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार विजेत्याचे नाव असलेल्या एका मोठ्या आकाराच्या लिफाफ्याने स्वतःला झाकून घेतले.
पुरस्कार सादर करायला आलेल्या जॉन सीनाला स्टेजवर नग्न अवस्थेत पाहून उपस्थित सगळे हसायला लागले. यानंतर, सीनाला थोडासा संकोचला. त्याने हा लिफाफा उघडला नाही. यावेळी तो गंमतीत म्हणाला की, ‘कपडे खूप महत्वाचे आहेत. कदाचित इथे ती सर्वात महत्वाची गोष्ट आहे.’ यानंतर जॉन सीनाला पडद्याने झाकण्यात आले. त्याचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. अर्थात हा स्क्रिप्टेड आणि गंमतीचा भाग असला, तरी लोक जोन सीनाचे कौतुक करत आहेत.
'पुअर थिंग्स'ने बेस्ट कॉस्च्युम डिझाईनसाठीचा ऑस्कर जिंकला आहे. हेअर आणि मेकअप, प्रोडक्शन डिझाइन आणि कॉस्च्युमसाठी लागोपाठ दोन ऑस्कर पुरस्कार मिळवत हा चित्रपट यंदाचा पहिला एकाहून अधिक ऑस्कर ट्रॉफी जिंकणारा चित्रपट ठरला आहे.
संबंधित बातम्या