मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Oscar 2023: ऑस्कर जिंकताच 'नाटू नाटू' गाण्याने केले तीन नवे विक्रम, जाणून घ्या कोणते

Oscar 2023: ऑस्कर जिंकताच 'नाटू नाटू' गाण्याने केले तीन नवे विक्रम, जाणून घ्या कोणते

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 13, 2023 02:03 PM IST

Oscar for Naatu Naatu Song : लॉस एंजलिस इथं झालेल्या ९५व्या ऑस्कर सोहळ्यावर भारताची मोहोर उमटली आहे. ‘आरआरआर’ या चित्रपटातील नाटू नाटू गाण्यासाठी भारताला ऑस्कर मिळाला आहे.

नाटू नाटू
नाटू नाटू (HT)

नुकताच ऑस्कर २०२३ हा पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाचा ९५वा ऑस्कर सोहळा लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात RRR या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला नॉमिनेशन मिळाले होते. त्यानंतर या गाण्याला ऑस्कर मिळाल्याचे समोर आले. आता या गाण्याने नवे तीन रेकॉर्ड केल्याचे समोर आले आहे.

नाटू नाटू गाण्यापूर्वी २००८मध्ये प्रदर्शित झालेल्या स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील जय हो या गाण्याला ऑस्कर मिळाला आहे. जय हो हा एक ब्रिटीश चित्रपट होता. त्यामुळे नाटू नाटू हे हिंदी चित्रपटातील पहिले गाणे आहे ज्याला ऑस्कर मिळाला आहे. आता ऑस्कर मिळाल्यानंतर नाटू नाटू गाण्याने तीन नवे रेकॉर्ड केले आहेत.
वाचा: ‘या’ चित्रपटाने जिंकला ऑस्कर २०२३ पुरस्कार, वाचा विजेत्यांची यादी

१. आरआरआर हा एकमेव भारतीय चित्रपट आहे ज्यामधील गाणे ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आले.

२. आशियातील नाटू नाटू हे पहिले गाणे आहे ज्याला ऑस्कर मिळाला आहे.

३. गोल्डन ग्लोब मिळणारे हे पहिले भारतीय गाणे

एसएस राजामौली यांनी ‘आरआरआर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, ‘नाटू नाटू’ हे गाणे एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणे गायक काला भैरव आणि राहुल यांनी गायले आहे. त्यांच्या या गाण्याने आता ऑस्कर जिंकत सर्वांच्या माना अभिमानाने उंचावल्या आहेत.

यंदाचा ९५वा ऑस्कर सोहळा हा लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात भारताला दोन ऑस्कर मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ही भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे.

WhatsApp channel

विभाग