Oscar 2023: दीपिका पादुकोणचा ऑस्करच्या रेड कार्पेटवरील लूक पाहिलात का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Oscar 2023: दीपिका पादुकोणचा ऑस्करच्या रेड कार्पेटवरील लूक पाहिलात का?

Oscar 2023: दीपिका पादुकोणचा ऑस्करच्या रेड कार्पेटवरील लूक पाहिलात का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 13, 2023 09:42 AM IST

Deepika Padukone at Oscar 2023 Red carpet: दीपिका पादूकोणच्या या लकूवर चाहते फिदा झाले आहेत.

दीपिका पादूकोण
दीपिका पादूकोण (HT)

Deepika Padukone at Oscar 2023 Red carpet: चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'ऑस्कर.' जगभरातील कलाकार या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात असतात. ऑस्कर २०२३ या पुरस्कार सोहळ्याला नुकताच सुरुवात झाली आहे. लॉस एंजलिसमध्ये आयोजित केलेल्या या ९५व्या ऑस्कर सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात विशेष स्थान पटकावले आहे. आता तिचा रेड कार्पेटवरील लूक समोर आला आहे.

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ऑस्कर सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील फोटो शेअर केले आहेत. या सोहळ्यासाठी तिने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर लॉंग गाऊन परिधान केला आहे. त्यावर छान असा डायमंडचा नेकलेस घातला आहे. या लूकमध्ये दीपिका अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या या लूकने सर्वांची मने जिंकली आहेत.

ऑस्कर प्रेझेंटर्स दीपिका पादूकोणची निवड करण्यात आली होती. दीपिकासोबत रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, जेनिफर कॉनेली, एरियाना डीबोस, सॅमुअल एल जॅक्सन, ड्वेन जॉनसन, माइकल बी जॉर्डन, ट्रॉय कोत्सुर, जोनाथन मेजर्स, मेलिसा मॅक्कार्थी, जेनेल मोनाए, क्वेस्टलव, जो सलदाना आणि डोनी येन हे प्रेझेंटर्स दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ऑस्करमध्ये प्रेझेंटर म्हणून दिसणार असल्याची माहिती दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.

Whats_app_banner