Viral Video : गाय बनून आलेल्या ‘या’ प्रसिद्ध चेहऱ्याला ओळखलंत का? हॅलोवीन पार्टीतील व्हिडीओमुळे होतोय ट्रोल!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video : गाय बनून आलेल्या ‘या’ प्रसिद्ध चेहऱ्याला ओळखलंत का? हॅलोवीन पार्टीतील व्हिडीओमुळे होतोय ट्रोल!

Viral Video : गाय बनून आलेल्या ‘या’ प्रसिद्ध चेहऱ्याला ओळखलंत का? हॅलोवीन पार्टीतील व्हिडीओमुळे होतोय ट्रोल!

Oct 25, 2024 08:34 AM IST

Viral Video : सोशल मीडिया सेन्सेशन ऑरी उर्फ ओरहान अवतरमानीचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ऑरीच्या या भन्नाट रूपाचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

ऑरी
ऑरी

Orry Viral Video : औरी उर्फ ओरहान अवतरमणी नेहमीच आपल्या लूकने लोकांना आश्चर्यचकित करत असतो. प्रत्येक वेळी लोक त्याच्या लूकचं कौतुक करतात. पण, यावेळी नेटकरी ऑरीला ट्रोल करताना दिसले आहेत. दरम्यान, गुरुवारी रात्री ऑरी वांद्रे येथील एका कॅफेबाहेर स्पॉट झाला होता. एका जवळच्या मित्राच्या हॅलोवीन पार्टीत सहभागी होण्यासाठी ,तो तिथे आला होता. या हॅलोवीन पार्टीसाठी ऑरीने चक्क गायीचा पोशाख परिधान केला होता. त्यामुळे लोक संतापले आणि त्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

व्हिडीओ पाहून नेटकरी वैतागले!

या पार्टीतून ऑरीचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये ऑरी हे कपडे सांभाळताना किती संघर्ष करतोय हे दिसले. हॅलोवीन पार्टीत सामील होण्यासाठी केलेल्या या वेशभूषेमुळे ऑरीला गाडीतून खाली उतरायला देखील त्रास होत होता. गाडीतून उतरण्यासाठी ऑरीच्या मॅनेजरने ऑरीच्या दिशेने हात पुढे केला आणि मग ऑरी आपल्या मॅनेजरच्या मदतीने गाडीतून खाली उतरू शकला. दुसऱ्या व्हिडीओत ऑरी कारमधून उतरल्यानंतर पापाराझींसमोर पोज देताना दिसत आहे. पाहूयात ऑरीचा भन्नाट हॅलोवीन लूक...

लोक काय म्हणतायत?

ऑरीचा पोशाख पाहिल्यानंतर लोक त्याला ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिलं, 'ऑरी जावेद, उर्फी जावेदचा भाऊ. आणखी एकाने लिहिले की, ‘लोक लक्ष वेधण्यासाठी काहीही करू शकतात. तिसऱ्याने लिहिलं, "पूर्वी मुलं फॅन्सी ड्रेसमध्ये अशी जायची. आता मोठमोठे लोक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन करत आहेत आणि ऑरी त्यात उर्फीशी स्पर्धा करत आहे.’ अशाच प्रकारच्या कमेंट ऑरीच्या या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

Bigg Boss 18 : लग्नाआधीच गरोदर, दुसऱ्या पतीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न; ‘बिग बॉस’ची 'व्हायरल भाभी' पुन्हा चर्चेत!

ऑरीची होते बक्कळ कमाई

ऑरी हा सध्या चर्चेत असलेला चेहरा आहे. जवळपास प्रत्येक पार्टीत त्याची हजेरी असते. अनेक सेलेब्ससोबत पार्ट्यांमध्ये दिसणारी ऑरी पैसे कमवण्यासाठी काय करते हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. ऑरी हा एक सोशल मीडिया सेन्सेशन, जागतिक फॅशन इनफ्ल्यूएन्सर आणि बॉलीवूड जेन-झीचा सर्वात चांगला मित्र आहे. ऑरी सेल्फीद्वारे दिवसाला २० ते ३० लाख रुपये कमावतो. तर, एखाद्या पार्टीला जाण्यासाठी देखील तो २० ते ३० लाख रुपये आकारतो. सहसा जेव्हा एखादा सेलिब्रिटी पार्टीला जातो, तेव्हा तो परफॉर्म करून निघून जातो. मात्र, ऑरी तसे करत नाही. तो संपूर्ण पार्टी एन्जॉय करताना दिसतो.

Whats_app_banner