सध्या सोशल मीडियावर ओरी म्हणजेच ओरहान अवत्रमणीची चर्चा सुरु आहे. सेलिब्रिटी नसतानाही प्रत्येक बड्या पार्टीला त्याची हजेरी असते. तसेच ओरीचे पार्टीमधील फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल होत असतात. पण सध्या ओरी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चर्चा अभिनेत्री पलक तिवारीने त्याची माफी मागितल्यामुळे सुरु झाल्या आहेत.
पलक आणि ओरी यांचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या चॅटमध्ये पलक ओरीची माफी मागत आहे. पलकने ओरीला मेसेज केला, "ओरी, मी पलक बोलत आहे. मी तुझी माफी मागावी, असे तुला वाटत आहे का?" यावर ओरीने इमोजी शेअर करुन रिप्लाय दिला. ओरीच्या मेसेजनंतर पलकने रिप्लाय दिला, "मी साराच्या सन्मानार्थ बोलत आहे." त्यावर ओरीने रिप्लाय दिला, 'एकतर तू स्वाभिमानाने माफी मागत आहेस कारण तुला कसे बोलावे कळत नाही.' आता पलकने ओरीची माफी का मागितली? हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
वाचा: यशच्या आयुष्यात पुन्हा गौरीची एण्ट्री, काय असेल आरोहीची प्रतिक्रिया
ओरी आणि पलक तिवारी यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये साराच्या नावाचा देखील उल्लेख आहे. ही सारा अली खान आहे, असा अंदाज नेटकरी लावत आहे. सारा अली खानचा भाऊ इब्राहिम अली खानला पलक डेट करत आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. खरे तर हे प्रायव्हेट चॅट ओरीने स्वत: इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला शेअर केले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.
पलकच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता तिचा 'द वर्जीन ट्री' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मौनी रॉय आणि संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
संबंधित बातम्या