मराठी चित्रपटसृष्टीतील ‘दुसरे निळू फुले’ अशी ज्यांची ओळख होती ते म्हणजे अभिनेते चंदू पारखी. “माझी जागा कोणी घेईल, तर तो चंदू पारखीच असेल,” असं खुद्द एकदा निळू फुले म्हणाले होते. अभिनयाची अनोखी शैली, मनोरंजन आणि वास्तविक अभिनयाचं उत्तम मिश्रण या वैशिष्ट्यगुणांमुळे त्यांनी आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
दूरदर्शनवरील ‘व्योमकेश बक्षी’, ‘अडोस पडोस’,‘लाईफलाईन’,’ जबान संभाल के’ अशा हिंदी मालिका, तर ‘राम जाने’, ‘अंगारे’ यासारख्या अशा हिंदी चित्रपटामधून ते प्रेक्षकांसमोर आले. मराठीतील ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘कळत नकळत’, ‘बाप रे बाप’, ‘बलिदान’, ‘वाजवा रे वाजवा’, यातील त्यांच्या भूमिकांचे विशष कौतुक देखील झाले. मात्र सिनेश्रुष्टीत आपली ओळख आणि बस्तान बसवण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता.
चंदू पारखी यांचे आयुष्य हे काट्याकुट्यानी भरलेल्या खडकाळ रस्त्याप्रमाणे होता. इंदूरमध्ये जन्मलेल्या चंदू पारखी यांनी अभिनयातच आपली कारकीर्द फुलवायची अशी खूणगाठ बांधून मुंबईचा रस्ता पकडला. फक्त शे-दोनशे रुपये खिशात घेऊन त्यांनी इंदूर ते मुंबई गाडी पकडली. इतक्या तुटपुंज्या पैशांत मुंबईत स्ट्रगलचा विचार देखील करणं एक प्रकारचा जुगारचं होता.
मुंबईमध्ये सुरुवातीचा काळ हा त्यांचासाठी एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हता. सुरुवातील काही नाटकात लहान सहन भूमिका करत दिवस ढकलले. कोणीतरी काम देईल या आशेत कधी कोणतं नाट्यगृह तर कधी दूरदर्शनची इमारत पण, कधी कधी अशी वेळ येत होती की, कि पोटाची खळगी भारण्याइतकेदेखील पैसे त्यांच्याजवळ नसायचे. अशावेळी ते चक्क लसूणच्या पाकळ्या खाऊन पोटाची भूक शमवत असत. मात्र या उपायामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शनचा कोर्स करण्यास सांगितलं मात्र आधीच पैशांची तंगी त्यात. आपण आजारी आहोत हे लोकांना कळलं तर आपल्याला कामं मिळताना कठीण जाईल, या भीतीने चंदू पारखींनी आजार अंगावरच काढला
एक दिवस दिग्दर्शक, अभिनेते विनय आपटे शिवाजी मंदिर नाट्यगृहात गेले असता. त्यांना चंदू पारखी भिंतीला टेकून खाली बसल्याचे दिसले. त्यावेळी त्यांना काय झालं असा विचारताच .चंदू पारखी यांनी ,''काही नाही थोडं गरगरल म्हणून बसलो'' असं सांगितलं. त्यावेळी बाजूला उभ्या असलेल्या कामगाराने त्यांना ते ३ दिवस जेवले नसल्याचे संगीतले. विनय आपटे यांनी चंदू यांना हातात लसणाच्या काही पाकळ्या दिसल्या. हातात लसूण कशाला असं विचारलं तर चंदू म्हणाले ''काही नाही लसूण खाल्लं कि भूक लागत नाही'' हे ऐकून विनय आपटे याना धक्काचं बसला. विनय आपटेंनी चंदू यांच्या जेवणाची सोय केली. इतकंच नव्हे तर काही ओळखिच्या निर्मात्यांशी संपर्क करत चंदू याना ३-४ नाटकात काम देत त्यांना २००० रुपये मिळवून दिले.
वाचा: दादा कोंडकेंच्या 'त्या' कृत्यामुळे ओशोंनी बोलावले होते भेटायला, वाचा नेमकं काय झालं होतं?
पुढे चंदू यांनी आपला अभिनयातला संघर्ष कायम ठेवला, हळूहळू आपल्या दमदार अभिनयाचा जोरावर त्यांनी स्वतःची ओळख मिळवून घेतली. पुढे जाऊन नाटकं, चित्रपट, मालिका अशा सर्व क्षेत्रावर त्यांनी आपल्या अभिनयाचा झेंडा फडकवला. मात्र या हरहुन्नरी कलाकाराने १४ एप्रिल १९९७ रोजी या जगाचा निरोप घेतला.
संबंधित बातम्या