Sushmita Sen: गर्दीत १५ वर्षांच्या मुलाने सुष्मिताला केला किळसवाणा स्पर्श अन्..; वाचा पुढे काय झालं?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sushmita Sen: गर्दीत १५ वर्षांच्या मुलाने सुष्मिताला केला किळसवाणा स्पर्श अन्..; वाचा पुढे काय झालं?

Sushmita Sen: गर्दीत १५ वर्षांच्या मुलाने सुष्मिताला केला किळसवाणा स्पर्श अन्..; वाचा पुढे काय झालं?

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 19, 2024 08:09 AM IST

Sushmita Sen: अनेकदा गर्दीच्या ठिकाणी कलाकारांना विचित्र पद्धतीने स्पर्श केल्याचे प्रसंग समोर येतात. अभिनेत्री सुष्मिता सेनला देखील अशाच एका घटनेचा सामना करावा लागला होता.

Sushmita Sen
Sushmita Sen (HT_PRINT)

बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री सुष्मिता सेन मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. केवळ चित्रपट आणि अभिनयच नव्हे, तर सुष्मिता सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. इंडस्ट्रीमध्ये सुष्मिता ही तिच्या प्रेमळ वागणूकीसाठी देखील विशेष ओळखली जाते. दोन मुलींना दत्तक घेऊन, त्यांना पोटच्या मुलींप्रमाणे प्रेम देणारी सुष्मिता एक प्रेमळ आई म्हणून देखील चर्चेत असते. मात्र, एका कार्यक्रमादरम्यान अवघ्या १५ वर्षांच्या लहान मुलाने सुष्मिताला किळसवाणा स्पर्श केला होता.

१५ वर्षांच्या मुलाने केला होता स्पर्श

अनेकदा गर्दीच्या ठिकाणी कलाकारांना विचित्र पद्धतीने हात लावण्याचे, स्पर्श करण्याचे प्रसंग घडत असतात. एका कार्यक्रमात सुष्मितासोबत देखील एक अशीच घटना घडली होती. ही घटना तिने एका मुलाखतीत बोलताना सांगितली होती. सुष्मिता म्हणाली, ‘एका कार्यक्रमादरम्यान भरपूर गर्दी होती, तिथे अनेक पुरुष होते. त्यावेळी मला कुणीतरी अतिशय किळसवाणा स्पर्श केला. इतक्या गर्दीत आपण सापडणार नाही असे त्या व्यक्तीला वाटले असावे. मात्र, मी हात पकडून त्या व्यक्तीला समोर आणले. त्यावेळी मला देखील धक्का बसला. कारण हा अवघ्या १५ वर्षांचा लहान मुलगा होता. त्यावेळी मी त्याच्यावर कडक कारवाई करू शकले असते.’

सुष्मिताने मुलाला चांगलेच सुनावले

पण, सुष्मिताने या मुलाविरोधात कोणतीही कारवाई केली नाही, तर तिच्या पद्धतीने त्याला धडा शिकवला. सुष्मिता त्या मुलाला आपल्या सोबत घेऊन गेली आणि त्याला प्रश्न विचारला की, मी ही सगळी घटना सर्वांसमोर सांगितली, तर तुझं काय होईल? यावर त्या मुलाने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली. आपण असं काही केलंच नाही, असे तो म्हणू लागला. पण, सुष्मिता त्याला म्हणाली की, तू जे केलंयस ते मला माहित आहे. तू तुझा गुन्हा कबूल केलास तर ते तुझ्यासाठी चांगलं असेल.
वाचा: चार वर्षांनी मायदेशी परतलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे व्यवसायात पदार्पण, मुंबईत सुरू केले रेस्टॉरंट

मुलाने मागितली होती माफी

सुष्मिताच्या समजवण्यानंतर त्या मुलाने आपलं कृत्य कबूल केलं आणि तिची माफी देखील मागितली. सुष्मिताने त्या मुलाला, या गोष्टी कशा चुकीच्या आहेत आणि त्याचा आयुष्यावर कसा परिणाम होऊ शकतो, याची समज दिली. यावर त्या मुलाने आपण पुन्हा असं कधीचं करणार नाही, असं प्रॉमिस देखील तिला दिलं.

Whats_app_banner