शाहरुख, सलमानपेक्षाही मोठा स्टार, दिले सलग २० फ्लॉप सिनेमे, आज उपचारासाठीदेखील पैसे नाहीत!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शाहरुख, सलमानपेक्षाही मोठा स्टार, दिले सलग २० फ्लॉप सिनेमे, आज उपचारासाठीदेखील पैसे नाहीत!

शाहरुख, सलमानपेक्षाही मोठा स्टार, दिले सलग २० फ्लॉप सिनेमे, आज उपचारासाठीदेखील पैसे नाहीत!

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 13, 2025 04:18 PM IST

नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला शाहरुख, सलमान आणि आमीर खान यांच्यापेक्षा हा अभिनेता लोकप्रिय होता. पण सतत फ्लॉप सिनेमे दिल्यामुळे त्याच्यावर आज ही परिस्थिती आली आहे.

Rahul Roy
Rahul Roy

गेल्या तीन दशकांमध्ये बॉलिवूडमध्ये सुपरस्टार अभिनेते म्हणून खान ओळखले जात आहे. त्यामध्ये शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानचा समावेश आहे. ९०च्या दशकाच्या सुरुवातीपासून शाहरुख, सलमान आणि आमिर यांनी मिळून बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले आहे. पण या सगळ्या कलाकारांना टक्कर देणारा एक अभिनेता होता. मात्र, एकापाठोपाठ सलग २० फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर त्याची आर्थिक परिस्थिती खालावली. आता या अभिनेत्याकडे स्वत: उपचार करण्यासाठी देखील पैसे उरले नाहीत.

कोण आहे हा अभिनेता?

या अभिनेत्याचे नाव राहुल रॉय आहे. त्याने १९९० साली प्रदर्शित झालेल्या 'आशिकी' या सुपरहिट सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तो आणि चित्रपटातील मुख्य अभिनेत्री अनु अग्रवाल रातोरात स्टार बनले. या चित्रपटाच्या यशाने त्याला वेगळी ओळख मिळवून दिली. आशिकीच्या यशानंतर राहुल अभिनीत अनेक हिट चित्रपट आले - ज्यात प्यार का साया आणि जुनून यांचा समावेश आहे. त्यावेळी सलमान आणि आमिर देखील इंडस्ट्रीमध्ये काम करत होते. पण राहुलने त्यांना मागे टाकले होते. तसेच शाहरुखने नुकताच पदार्पण केले होते. मात्र, राहुलचे हे स्टारडम फार काळ टिकले नाही.

Rahul Roy and Anu Agarwal in Aashiqui.
Rahul Roy and Anu Agarwal in Aashiqui.
Rahul Roy and Karisma Kapoor in Sapne Saajan Ke.
Rahul Roy and Karisma Kapoor in Sapne Saajan Ke.

राहुल रॉयच्या कामाविषयी

नव्वदच्या दशकाच्या मध्यात राहुलने साइन केलेले अनेक सिनेमे रखडले होते. बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या इतर चित्रपटांना त्यांनी नकार दिला. शाहरुखला स्टार बनवणाऱ्या यश चोप्राच्या डर ला त्याने नकार दिला होता. त्याचवेळी त्याचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरू लागले. १९९२ मध्ये जुनूननंतर राहुलने पुढील ९ वर्षांत सलग १५ फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केले. २००१ मध्ये प्रदर्शित झालेला अफसाना दिलवालों का हा त्याचा शेवटचा मुख्य भूमिकेतील चित्रपट होता. त्यानंतर राहुलने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला आणि २००६ मध्ये चित्रपटांमध्ये पुनरागमन केले.

बिग बॉसमध्ये झाला सहभागी

राहुलच्या पदरात पुन्हा निराशा आली. त्याने पुन्हा ५ फ्लॉप सिनेमे दिले. २०१०मध्ये त्याने सहाय्यक अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्येही त्याने भाग घेतला होता. पण हा शो जिंकूनही त्याचे स्टारडम किंवा लोकप्रियता पुनरुज्जीवित होऊ शकली नाही.
वाचा: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास अडकणार विवाहबंधनात, कोण आहे ती मुलगी?

News clippings from HT Archives from early 1990s.
News clippings from HT Archives from early 1990s.
News clippings from HT Archives from early 1990s.
News clippings from HT Archives from early 1990s.

उपचारासाठी देखील पैसे शिल्लक नाहीत

२०२०मध्ये राहुल रॉयला हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे शरीर पॅरलाइज झाले होते. त्याला अनेक महागड्या वैद्यकीय उपचारांची आवश्यकता होती. २०२३ मध्ये बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत त्याने खुलासा केला होता की, त्याच्याकडे वैद्यकीय बिल भरण्यासाठीही पैसे नव्हते आणि त्याचा माजी सहकलाकार सलमान खान त्याच्या मदतीला धावून आला होता. २०२३ मध्ये राहुल रॉय ने अभिनेता आणि निर्माता म्हणून चित्रपटांमध्ये पुनरागमन केले. तो अजूनही मुंबईतच राहतो. २०२३ मध्ये कानू बहलच्या आग्रा चित्रपटात तो सहाय्यक भूमिकेत दिसला होता.

Whats_app_banner