दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी व अभिनेता गश्मीर महाजनीच्या आई माधवी महाजनी यांचं ‘चौथा अंक’ नावाचं आत्मचरित्र नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या पुस्तकात माधवी यांनी वानखेडे स्टेडियम आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या संबंधित एक किस्सा नमूद केला आहे. माधवी एकेकाळी वानखेडे स्टेडिअममध्ये नोकरी करत होत्या, त्यावेळचा एक किस्सा आहे. वानखेडे स्टेडियम मध्ये नोकरी करत असताना माधवी यांना प्रचंड त्रास दिला गेला. या घटनेबाबत जेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना कळलं तेव्हा त्यांनी काय केले? याचा किस्सा त्यांनी या पुस्तकात सांगितला आहे.
माधवी यांनी पुस्तकात म्हटले की त्या वानखेडे स्टेडिअममध्ये मी मेन्टेनन्सचे काम करीत होत्या. त्यांच्या हाताखाली आठ मुले कामाला होती. स्वच्छता, स्टॉक बघणे ही कामे माधवी बघायच्या. तिथल्या एकूण स्टाफपैकी माधवी एकट्याच पदवीधर होत्या. पण त्यातून तिथल्या काही मुलांच्या मनात त्यांच्याबद्दल आकस निर्माण झाला. त्यांच्या ऑफिसमध्ये दोनदा लेटमार्क चालत असे, पण एकाच महिन्यात जर तिसरा लेटमार्क झाला की एका दिवसाचा पगार कापला जाई. अशावेळी स्टाफची ती मुलं त्यांच्या नावापुढे लेटमार्क झाल्याचे दर्शवण्यासाठी लाल चौकोन करायचे.
एकदा माधवी ऑफिसमधून घरी आल्या तेव्हा त्यांचे पती रवींद्र महाजनी यांची मुलाखत घेण्यासाठी कोणीतरी पत्रकार बाहेर बसले होते होता. माधवी यांच्या मनात राग खदखदत होता. ''सगळं काम मी नीट करत असतानाही माझे रेकॉर्ड कुणीतरी खराब करत होतं'' असे त्यांनी रवींद्र याना संगीतले. हे संभाषण मुलाखत घेणाऱ्या तरुणाच्या कानावर पडले. त्याने त्यांच्याशी काहीही न बोलता परस्पर बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नीला म्हणजेच मीनाताई ठाकरे यांना फोन केला. त्या पत्रकाराने दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ त्याने माधवी यांच्यासाठी घेतली. ‘अरे, एवढीशी गोष्ट थेट बाळासाहेबांना कशाला सांगायची? याची काहीही गरज नव्हती’, असे माधवी म्हणाल्या. पण त्यांच्या भेटीची वेळ त्याने घेतली होती.
वाचा: बॉलिवूडमधील 'हा' सिनेमा आहे छोटा राजनच्या जीवनावर आधारित? संजय दत्तने साकारली होती भूमिका
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी ते बाळासाहेबांकडे गेले. माधवी त्यांच्या घरी गेल्या तेव्हा बाळासाहेबांनी त्यावेळचा त्यांचा युनियन लीडर मोरेला मातोश्रीवर बोलावले होते. तो आला तेव्हा खूप घाबरलेला होता, घाम पुसतच तो आला होता. बाळासाहेबांनी त्याला फैलावर घेतलं. ‘या कोण आहेत माहिती आहे का? यांच्या वाटेला कोणी गेलं तर बघा’, असं त्याला सुनावलं. मीनाताईही घरी होत्या, त्यांनी माधवी यांना आत बोलावलं. त्यांचं बोलणं वगैरे झालं. त्यानंतर मात्र माधवी यांना ऑफिसमध्ये कुणी त्रास द्यायला धजावलं नाही.
संबंधित बातम्या