झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'देवमाणूस.' या मालिकेतील डॉ अजित कुमारने सर्वांची मने जिंकली आहेत. अजित कुमार ही भूमिका अभिनेता किरण गायकवाडने साकारली आहे. आता किरण गायकवाडची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे.
किरणणे त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने 'आता पुढचा प्रवास हिच्या सोबत' असे कॅप्शन दिले आहे.
किरणने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक नवी कार खरेदी केली आहे. त्याने किया कंपनीची ही कार खरेदी केली आहे. किरणाचा नव्या कारसोबतचा व्हिडीओ पाहून अनेकांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तसेच अनेक कलाकारांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
किरण गायकवाडची मुख्य भूमिका असलेली मालिका 'देवमाणूस'च्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.