Old TV Serials : ९०च्या दशकांत 'या' ५ मालिकांनी केलं प्रेक्षकांच्या मनावर राज्य! तुम्ही पाहिल्यात का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Old TV Serials : ९०च्या दशकांत 'या' ५ मालिकांनी केलं प्रेक्षकांच्या मनावर राज्य! तुम्ही पाहिल्यात का?

Old TV Serials : ९०च्या दशकांत 'या' ५ मालिकांनी केलं प्रेक्षकांच्या मनावर राज्य! तुम्ही पाहिल्यात का?

Dec 10, 2024 02:02 PM IST

Nostalgia Old TV Serials : ९०च्या काळात मोजक्याच मालिका प्रदर्शित होत असल्याने संपूर्ण कुटुंब एकत्र बसून या मालिका बघायचे. यातही एक वेगळीच मजा असायची.

Nostalgia Old TV Serials
Nostalgia Old TV Serials

Nostalgia Old TV Serials: आता जरी भरपूर ओटीटी प्लॅटफॉर्म आले असले, तरी ९०च्या दशकांत दूरदर्शन हे एकमेव मनोरंजनाचे साधन होते. यावर लागणाऱ्या मालिका अगदी आताच्या नेटफ्लिक्स आणि इतर ओटीटी माध्यमांना मागे टाकतील अशा होत्या. या काळात मोजक्याच मालिका प्रदर्शित होत असल्याने संपूर्ण कुटुंब एकत्र बसून या मालिका बघायचे. यातही एक वेगळीच मजा असायची. ८० आणि ९०च्या दशकातील लोक दूरदर्शनवर विविध प्रकारच्या शीर्ष मालिका पाहत मोठे झाले आहेत. यापैकी काही डेली सोप तर अशा होत्या की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील लोक ते पाहण्यासाठी आतुरतेने वाट बघायचे. आजही त्या मालिकांची नावे प्रत्येकाच्या ओठावर आहेत. यातील काही मालिका इतक्या प्रसिद्ध आहेत की, आजही लोक त्यांना यूट्यूबवर पाहतात.

मात्र, आजच्या नवीन पिढीतील मुलांना दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या उत्कृष्ट मालिकांबद्दल माहिती नाही. चला तर, आज आम्ही तुम्हाला अशा मालिकांबद्दल सांगणार आहोत ज्या त्या काळात खूप गाजल्या.

व्योमकेश बक्षी

‘व्योमकेश बक्षी’ हा दूरदर्शनवर प्रसारित होणारा लोकप्रिय गुप्तहेर कार्यक्रम होता, जो १९९३ मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाला होता. यामध्ये कोलकातामधील हा गुप्तहेर गुंतागुंतीची प्रकरणे सोडवायचा. यातील प्रत्येक केस अद्वितीय आणि मनोरंजक होती. जेव्हा जेव्हा भारतीय हेरगिरी मालिकांबद्दल बोलले जाते, तेव्हा या मालिकेचे नाव प्रथम घेतले जाते.

Bollywood Nostalgia : ८१ वर्षांपूर्वी बनलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलेलं! ५ लाखाच्या बजेटमध्ये कमावलेले 'इतके' कोटी

शक्तिमान

शक्तिमान’ ही मालिका पाहिली नाही, अशी व्यक्ती क्वचितच असेल. या मालिकेबद्दल सर्वांनी ऐकले असेल. एकेकाळी हा सगळ्यांचा आवडता शो असायचा. भारतीय टेलिव्हिजनवरील हा पहिला सुपरहिरो शो होता, ज्याला मुलांनी सर्वाधिक पसंती दिली. ज्यामध्ये मुकेश खन्ना यांनी शक्तिमान आणि गंगाधर यांची दुहेरी भूमिका साकारली होती. या मालिकेमध्ये शक्तिमान सत्य, धर्म आणि न्यायासाठी लढतो.  मानवतेला धोकादायक शत्रूंपासून वाचवण्यासाठी आपल्या शक्तींचा योग्य वापर करतो, हा एक प्रतिष्ठित शो मानला गेला आहे.

चंद्रमुखी

‘चंद्रमुखी’ १९९०च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित होत असे. ही मालिका त्या काळातील अविस्मरणीय मालिकांपैकी एक होती. ही कथा एका सुंदर आणि शूर राजकन्येवर आधारित होती, जिच्याशी लग्न करण्यासाठी अनेक राजकुमार आणि योद्ध्यांनी स्पर्धा केली होती.

हम

याशिवाय अशी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला यायची, जी सामाजिक विषयांवर आधारित मालिका होती. ज्यामध्ये गावातील समस्या सखोलपणे मांडण्यात आल्या होत्या.

क्यूंकी जीना इसी का नाम है

याच दरम्यान ‘क्यूंकी जीना इसी का नाम है’ ही मालिकाही दूरदर्शनवर प्रसारित झाली. त्यात सामाजिक समस्या दाखवल्या होत्या. ही एकेकाळी लोकांची आवडती मालिका असायची.

Whats_app_banner