Viral Video: पॅपराझी दररोज सेलिब्रिटींच्या मागे जाऊन त्यांचे फोटो काढताना दिसतात. ते एकही कलाकाराला सोडत नाहीत. सध्या सोशल मीडियावर सारा अली खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पॅपराझी तिचे फोटो क्लिक करत असल्याचे दिसत आहे. पण इथे ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा एक वृद्ध व्यक्ती पॅपराझींना साराचे फोटो क्लिक करण्यापासून रोखते. सारा स्वत: आश्चर्यचकित झाली आहे. मात्र, सोशल मीडियावर त्या काकांचे कौतुक होत आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर सारा अली खानचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकाल की सारा सलूनमधून बाहेर येते आणि पॅपराझी तिचे फोटो क्लिक करू लागतात. तेवढ्यात एक म्हातारे काका येतात आणि फोटोग्राफर्सचा कॅमेरा हिसकावून घेतात. कॅमेरावर हात ठेवतात. ते काही फोटोग्राफर्सच्या कॅमेरा समोर येऊन उभे राहतात. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. सारा जेव्हा हे बघते तेव्हा ती आश्चर्याने त्या काकांकडे बघते आणि मग हसून निघून जाते.
सोशल मीडियावर साराचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने, "काकांचा आदर" असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने "काकांचे कौतुक आहे. त्यांनी स्वत:च्या मुलीप्रमाणे साराचे फोटो काढण्यापासून थांबवले आहे" असे म्हटले आहे.
वाचा: मुलीच्या मृत्यूने खचल्या होत्या अनुराधा पौडवाल, स्वप्नात झाला कालीमातेचा साक्षात्कार आणि...
सारा अली खानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती मर्डर मुबारक आणि ऐ वतन मेरे वतन या चित्रपटात दिसली होती. दोन्ही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आणि त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता ती अनुराग बसूच्या मेट्रो दिस डेज या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि कोंकणा सेन शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.