Ankita Prabhu Walawalkar Angry : 'बिग बॉस मराठी ५'ची गाजलेली स्पर्धक आणि महाराष्ट्राची लाडकी 'कोकणहार्टेड गर्ल' म्हणजेच युट्यूबर अंकिता प्रभू-वालावलकर हिने नुकतीच आलिशान महागडी गाडी विकत घेतली आहे. लक्झरी ब्रँड ऑडीची आलिशान गाडी घेतल्यापासून कोकणहार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकर प्रचंड चर्चेत आली आहे. मात्र, आता याच गाडीमुळे अंकिता वैतागली देखील आहे. काही लोकांमुळे अंकिताला आता इतका मन:स्ताप झाला आहे की, तिने एक स्टोरी पोस्ट करून लोकांना असं करू नका, असे आवाहन केले आहे.
'कोकणहार्टेड गर्ल' म्हणजेच युट्यूबर अंकिता प्रभू-वालावलकर हिने काहीच दिवसांपूर्वी तिची एमजी ही गाडी विकली होती. त्यावेळी देखील अंकिताला ट्रोलिंगकहा सामना करावा लागला होता. आता तिने नवी गाडी घेतल्यानंतर काही लोकांच्या प्रश्नांनी तिला भंडावून सोडले आहे. अंकिताने गाडी विकत घेऊन तिच्यासोबत फोटो शेअर केल्यानंतर तिच्या फोनवर सतत काही नोटिफिकेशन्स येत आहेत. काही लोक तिच्या गाडीचा नंबर एका अॅपमध्ये टाकून गाडीच्या इतर डिटेल्स मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या गाडीची माहिती देणाऱ्या अॅपमध्ये अंकिताला सतत नोटिफिकेशन येत आहेत. लोक तिच्या गाडीची माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींनी तर तिला थेट मेसेज करून गाडी तुझीच आहे का, असा प्रश्न विचारला आहे.
अखेर या सगळ्यामुळे वैतागलेल्या अंकिताने आपल्या फोनमधील या नोटिफिकेशनचा एक स्क्रीन शॉट शेअर करून लोकांना उत्तर दिले आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिले की, 'का एवढी मेहनत घेताय? माझी गाडी सेकंड हँड नाही आहे, माझ्याच नावावर आहे. सकाळपासून नुसते नोटिफिकेशन येतायेत कार सर्चचे.' या वेळी तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक मेसेज दिसत आहे, ज्यात अंकिताच्या गाडीचा नंबर कोणीतरी सर्च करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.
इंटरनेटच्या जादुई दुनियेमुळे अनेक गोष्टी आजकाल खूप सोप्या झाल्या आहेत. आपल्या हातातील छोटेसे डिव्हाईस अर्थात आपल्या फोनमध्ये असलेल्या प्लेस्टोअरमध्ये गाडीची माहिती शोधून देणारे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. अशा एखाद्या अॅपमध्ये जर तुम्ही एखाद्या गाडीचा नोंदणी क्रमांक टाकला, तर तुम्ही त्या गाडीची इतर माहिती, त्याच्या मालकाचे नाव इत्यादी गोष्टी सहज एका क्लीकवर मिळवू शकता. असेच अॅप्स वापरुन लोक अंकिता प्रभू-वालावलकर हिच्या गाडीची माहिती शोधत आहेत.
संबंधित बातम्या