Marathi Actresses Turns Business Woman : मराठी मनोरंजन विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. मात्र, केवळ अभिनयच नाही तर उद्योग विश्वात देखील काही मराठमोळ्या अभिनेत्रींनी आपलं नाव गाजवलं आहे. काही अभिनेत्रींनी स्वतःचं हॉटेल सुरू केलं आहे, तर काही अभिनेत्री कपड्यांचा ब्रँड चालवतात. चला तर, एक नजर टाकूया अशाच काही उद्योजिका असलेल्या अभिनेत्रींच्या करिअरवर...
'रंग माझा वेगळा', 'घरोघरी मातीच्या चुली' यासारख्या मालिका गाजवणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे हिचे नाव टीव्हीच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. रेश्माने अभिनयासोबतच स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये रेश्माने स्वतःचं ज्वेलरी दुकान सुरू केलं आहे. नुकतीच ही अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने उद्योजिका म्हणून नवीन प्रवास सुरू केला होता.
मराठी मनोरंजन विश्वातील 'लाफ्टर क्वीन' म्हणजेच अभिनेत्री श्रेया बुगडे हिने देखील अभिनयासोबतच उद्योग विश्वातही पदार्पण केले आहे. 'चला हवा येऊ द्या', 'फू बाई फू' अशा लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांना हसवणारी श्रेया आता स्वतःचं हॉटेल देखील चालवत आहे. श्रेया बुगडे हिने दादरमध्ये 'द बिग फिश अँड कंपनी' या नावाचं हॉटेल सुरू केलं आहे.
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून अवघ्या प्रेक्षकांच मन जिंकून घेणाऱ्या मृणाल दुसनिसने गेल्या काही वर्षांपासून अभिनयातून ब्रेक घेतला होता. मात्र, आता ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतली आहे. इतकंच नाही तर, या वर्षात अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने व्यवसाय क्षेत्रात देखील पदार्पण केलं. मृणाल दुसानिसने देखील स्वत:चं हॉटेल सुरू केलं आहे. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये मृणालचं हे रेस्टॉरंट सुरू झालं आहे. या रेस्टॉरंटचं नाव ‘बेली लाफ्स’ असं आहे.
‘चला हवा येऊ द्या’ फेम संगीतकार तुषार देवल आणि त्याची पत्नी अभिनेत्री स्वाती देवल यांनी देखील व्यवसायात पाऊल टाकलं आहे. या त्यांनी स्वत:चं मिसळ हॉटेल सुरू केलं आहे. त्यांच्या ‘देवल मिसळ’ या शाखेचं उद्धाटन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. या हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी खवय्यांची गर्दी असते.
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने पुण्यात स्वतः व्यवसाय सुरू केला आहे. तेजस्विनीने पुण्यात एक आलिशान सलोन उघडलं आहे. तिच्या नव्या सलोनचं नाव ‘एएम टू एएम’ असं आहे. अभिनेत्रीच्या या सलोनचं उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. याशिवाय तिचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड देखील आहे.
हरहुन्नरी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही अभिनेत्री म्हणून जितकी प्रसिद्ध आहे, तितकाच तिचा दागिन्यांचा ब्रँड 'प्राजक्त राज'देखील प्रसिद्ध झाला आहे. महाराष्ट्राचे पारंपरिक आणि काळाच्या ओघात लुप्त होत चालले दागिने एका नव्या अंदाजात सगळ्यांच्या भेटीला घेऊन येत आहे
संबंधित बातम्या