करण जोहर-सलमान खान नव्हे, ‘Bigg Boss OTT 3’ची धुरा सांभाळणार अनिल कपूर! कधीपासून सुरू होणार शो?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  करण जोहर-सलमान खान नव्हे, ‘Bigg Boss OTT 3’ची धुरा सांभाळणार अनिल कपूर! कधीपासून सुरू होणार शो?

करण जोहर-सलमान खान नव्हे, ‘Bigg Boss OTT 3’ची धुरा सांभाळणार अनिल कपूर! कधीपासून सुरू होणार शो?

Published Jun 07, 2024 08:55 AM IST

या शोच्या निर्मात्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून शोच्या होस्टचे अधिकृत पोस्टर रिलीज केले आहे. आता या पोस्टरमध्ये अनिल कपूरचा चेहरा आणि लूक समोर आला आहे.

करण जोहर-सलमान खान नव्हे, ‘Bigg Boss OTT 3’ची धुरा सांभाळणार अनिल कपूर
करण जोहर-सलमान खान नव्हे, ‘Bigg Boss OTT 3’ची धुरा सांभाळणार अनिल कपूर

बिग बॉस ओटीटी सीझन ३’ची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत. आता या शोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता शोच्या होस्टनंतर त्याच्या प्रीमियरची तारीखही समोर आली आहे. नुकतीच, 'बिग बॉस ओटीटी ३'च्या निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर केली आणि शोच्या रिलीजची तारीख अधिकृतपणे घोषित केली आहे. हा शो जून महिन्यात येणार आहे, हे आत्तापर्यंत सर्वांनाच माहीत होते. पण, जून सुरू झाला तरी, शो अजून सुरू झालेला नाही. अशा परिस्थितीत चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर आता याची नेमकी तारीख समोर आली आहे.

बिग बॉसच्या निर्मात्यांनी अनिल कपूरचे पोस्टर केले रिलीज!

या शोच्या निर्मात्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून शोच्या होस्टचे अधिकृत पोस्टर रिलीज केले आहे. आता या पोस्टरमध्ये अनिल कपूरचा चेहरा आणि लूक समोर आला आहे. समोर आलेल्या पोस्टरमध्ये अनिल कपूरचा डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे. कलाकारांचे एक्सप्रेशन बघून असे वाटते की, शोमध्ये कोणी मर्यादा ओलांडली तर अनिल कपूरही गप्प बसणार नाही. यावेळी स्पर्धकांना असा विचार करून अजिबातच शांत बसता येणार नाही, की सलमान खान नाही तर त्यांना कुणी काही बोलणार नाही.

चंदीगड विमानतळावरील थप्पड प्रकरणानंतर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया! म्हणाली ‘मी सुरक्षित आहे, पण...’

समोर आलेल्या या पोस्टरमध्ये अनिल कपूर काळ्या रंगाच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. त्याचा लूक खूप पसंत केला जात आहे. आता अनिल कपूरच्या या जबरदस्त लुकसह, निर्मात्यांनी खुलासा केला आहे की, हा शो २१ जूनपासून सुरू होणार आहे. म्हणजेच आता या शोचे काउंटडाउन सुरू झाले आहे. लोकांना अजून १५ दिवस वाट पहावी लागणार आहे. २१ जूनपासून त्यांना मनोरंजनाचा खरा डोस मिळणार आहे. हा शो १५ दिवसांनी म्हणजेच २१ जून रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होईल.

कोण बनणार बिग बॉसचा भाग?

आता या शोच्या स्पर्धकांचीही माहिती समोर येत आहे. आत्तापर्यंत अनिल कपूरच्या या शोसाठी अनेक सेलिब्रिटींची नावे पुढे आली आहेत. यापैकी एक नाव आहे क्रिती सेननची बहीण नुपूर सेनन. याशिवाय डॉली चायवाला, व्हायरल वडा पाव गर्ल उर्फ चंद्रिका दीक्षित आणि यूट्यूबर मॅक्सटर्न उर्फ सागर ठाकूर या शोमध्ये सामील झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र, अद्याप कोणाच्याही नावाची पुष्टी झालेली नाही.

Whats_app_banner