आयटम साँगसाठी पैसे दिले नाही; सेक्सी दिसण्यासाठी तोकडं ब्लाऊज घाला म्हणाले! अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आयटम साँगसाठी पैसे दिले नाही; सेक्सी दिसण्यासाठी तोकडं ब्लाऊज घाला म्हणाले! अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

आयटम साँगसाठी पैसे दिले नाही; सेक्सी दिसण्यासाठी तोकडं ब्लाऊज घाला म्हणाले! अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Nov 02, 2024 01:44 PM IST

Nora Fatehi Shocking Revelation : नोरा फतेहीने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी दिली आहेत, ज्यात तिच्या डान्स मूव्ह्सने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र, आता तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

नोरा फतेही
नोरा फतेही

Nora Fatehi Shocking Revelation : अभिनेत्री नोरा फतेही हिने बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक हिट आयटम साँग दिले आहेत. २०१८मध्ये आलेल्या ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर’ या गाण्यामुळे तिला पहिल्यांदा लोकप्रियता मिळाली होती. हे गाणं सुपरहिट झालं होतं आणि गाण्याला अब्जावधी व्ह्यूज मिळाले होते. पण, या गाण्यासाठी नोराला पैसेच मिळाले नाहीत, हे तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा तिला हे गाणे ऑफर करण्यात आले, तेव्हा ती आपली बॅग पॅक करून भारत सोडणार होती, असेही तिने एका मुलाखतीत सांगितले.

नोराने राजीव मसंदला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिने स्त्रीचे लोकप्रिय गाणे कमरिया आणि नंतर दिलबर शूट केले होते. या दोन मोठ्या गाण्यांमध्ये तिने भन्नाट परफॉर्म केलं, पण त्यासाठी तिला पैसे मिळाले नाहीत. नोरा म्हणाली, ‘जेव्हा मी या दोन गाण्यांच्या निर्मात्यांना भेटले, तेव्हाच मला सांगण्यात आलं होतं की, यासाठी पैसे मिळणार नाहीत. मी देखील ते काम विनामूल्य केले आणि मी ते फुकट केले, कारण मला असे वाटले की, आता माझ्यासाठी पैसे कमावण्याची वेळ नाही. सध्या स्वत:ला सिद्ध करण्याची आणि नाव कमावण्याची वेळ आली होती.’

Nora Fatehi: अभिनेत्री नोरा फतेही झाली डीपफेकची शिकार! सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...

आधीच सांगितलं पैसे मिळणार नाहीत!

नोरा म्हणाली की, तिने 'सत्यमेव जयते' आणि 'स्त्री' चित्रपट पाहिले आहेत आणि या चित्रपटांचा भाग होणे ही तिच्यासाठी एक मोठी गोष्ट होती. पैशांची गरज असूनही तिने पैशांचा विचार केला नव्हता. नोरा म्हणाली, ‘जेव्हा मी चित्रपट निर्मात्यांसोबत बसले, तेव्हा मी म्हणालो की बघा आपण याला आयटम साँग बनवू शकतो आणि फक्त हॉट आणि सेक्सी दिसू शकतो किंवा आपण गेम बदलून तो व्हिज्युअली चांगले बनवू शकतो. एक असे गाणे बनवू शकतो जे कुटुंबासमवेत सर्वजण पाहू शकतील.’

तोकडा ब्लाऊज दिला

नोराने म्हटले की, जेव्हा तिला या गाण्यासाठी ब्लाऊज देण्यात आला, तेव्हा तो खूपच लहान होता. नोराने हा तोकडा ब्लाऊज घालण्यास थेट नकार दिला. नोरा म्हणाली की, ‘मी इतका तोकडा ब्लाऊज घालू शकत नाही. हे गाणं सेक्सी असलं तरी मी अश्लील दिसू शकत नाही. मग त्यांनी मला एक नवीन ब्लाऊज दिला, ज्यात मी कम्फर्टेबल होतो. बऱ्याच लोकांना तोही खूप सेक्सी वाटला असेल, परंतु माझ्यासाठी तो किमान चांगला होता. त्यात मी कम्फर्टेबल होते.’ नोरा फाटेही जेव्हा हे गाणे करत होती, तेव्हा तिचा संघर्षाचा काळ सुरू होता. त्यावेळी तिच्याकडे दोन वेळ पोट भरण्यासाठी देखील पैसे नव्हते. व्यवस्थित जेवण मिळत नसल्याने ती खूप बारीक झाली होती.'

Whats_app_banner