Viral Video: ती नाचण्याची जागा नाही; नोराचा मेट्रोमधील 'सैराट'वर डान्सपाहून नेटकरी संतापले-nora fatehi dance in mumbai metro video viral ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: ती नाचण्याची जागा नाही; नोराचा मेट्रोमधील 'सैराट'वर डान्सपाहून नेटकरी संतापले

Viral Video: ती नाचण्याची जागा नाही; नोराचा मेट्रोमधील 'सैराट'वर डान्सपाहून नेटकरी संतापले

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 14, 2024 01:35 PM IST

Nora Fatehi Viral Video: मुंबई मेट्रोत नोराने डान्स केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तिच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

Nora Fatehi Viral Video
Nora Fatehi Viral Video

Nora Fatehi Dance in Mumbai Metro : आरस्पानी सौंदर्य आणि आपल्या डान्सने अनेकांच्या मनावर राज्य करणारी बेली डान्सर म्हणजे नोरा फतेही. तिचा बोल्ड अंदाज आणि डान्स मूव्हने ती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. एक साधी बेली डान्सर ते कार्यक्रमात परिक्षक इथपर्यंत नोराने पल्ला गाठला आहे. सध्या सोशल मीडियावर नोराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती मुंबई मेट्रोमध्ये डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी नोराला चांगले सुनावले आहे.

नोरा सध्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून दिसत आहे. या शोला पोहण्यासाठी नोराला उशिर होत असल्यामुळे तिने ट्राफिकमध्ये न अडकता मुंबई मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. या प्रवासादरम्यान तिने अॅनिमल प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसवर तिने केस मोकळे सोडले आहेत.मेट्रोची सुरक्षा तपासणी करुन नोराने मुंबई मेट्रोत प्रवेश केला. त्यानंतर ती चालत्या ट्रेनमध्ये इतर प्रवाशांसोबत डान्स करताना दिसली आणि तिची प्रसिद्ध स्टेप ऑफ ट्वर्किंगही केली. नोराने मराठमोठ्या झिंगाट गाण्यावर मेट्रोत डान्स केला. पण तिचा हा स्टंट नेटिझन्सच्या पसंतीस उतरला नसल्याचे चित्र आहे.
वाचा: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लग्नासाठी दुबईत गेली अन् तरुंगात पोहोचली; काय झालं नेमकं जाणून घ्या

नेटकरी संतापले

नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. नोराने केलेले कृत्य पाहून नेटकरी संतापले आहेत. एका यूजरने कमेंट करत 'ती डान्स करण्याची जागा नाही' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'ती कधीच चांगले कपडे का घालू शकत नाही?' अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने 'तुम्ही मेट्रोमध्ये का नाचत आहात?' असा प्रश्न विचारला आहे. नेटकरी नोरावर संताप व्यक्त करत आहेत.
वाचा: "तू आई होऊ शकणार नाहीस", जुई गडकरीने सांगितले धक्कादायक वास्तव

नोराच्या कामाविषयी

नोरा फतेही लवकरच कुणाल खेमूच्या 'मडगाव एक्सप्रेस' या चित्रपटात दिसणार आहे. सध्या ती या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. तसेच नोरा 'डान्स प्लस प्रो' या डान्स कार्यक्रमात परिक्षक म्हणून दिसत आहे. तिच्यासोबत रेमो डिसूजा, शक्ती मोहन, पुनित पाठक आणि राघव जुयाल या शोचे जज आहेत. सोशल मीडियावर तिच्या या डान्सची जोरदार चर्चा होती. या व्हिडिओमध्ये नोरा तिच्या नाच मेरी जान या गाण्यावर थिरकताना दिसली.

Whats_app_banner
विभाग