मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nora Fatehi: वर्ल्ड कपमध्ये डान्स ते २०० कोटी रुपये खंडणी प्रकरणी नाव, जाणून घ्या नोराविषयी

Nora Fatehi: वर्ल्ड कपमध्ये डान्स ते २०० कोटी रुपये खंडणी प्रकरणी नाव, जाणून घ्या नोराविषयी

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 06, 2024 08:03 AM IST

Nora Fatehi Birthday Special: आरस्पानी सौंदर्य आणि मादक अदांनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी नोरा फतेही आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

Nora Fatehi
Nora Fatehi

Nora Fatehi Personal Life : आरस्पानी सौंदर्य आणि मादक डान्स मूव्हने अनेकांच्या मनावर राज्य करणारी बेली डान्सर म्हणून नोरा फतेही ओळखली जाते. तिचा बोल्ड अंदाज आणि डान्स मूव्हने कायमच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात. तसेच नोराची कर्व्ही फिगर चाहत्यांसाठी आकर्षण ठरते. नोराने आजवर साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आज ६ फेब्रुवारी रोजी नोराचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या विषयी काही खास गोष्टी.

अप्रतिम बेली डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारी नोरा फतेही मोरक्कन-कॅनेडियन अभिनेत्री आहे. तिने सौंदर्याबरोबरच आपल्या नृत्याच्या माध्यमातून चाहत्यांवर भुरळ पाडली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का नोराला करिअरच्या सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. ती जेव्हा पहिल्यांदा भारतात आली तेव्हा तिच्याकडे केवळ पाच हजार रुपये होते. तिला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण नोरा खचून गेली नाही. तिने परिस्थिची सामना केला.
वाचा: तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकल्यानंतर रॅपरला झाली अटक, काय आहे प्रकरण?

मूळची कॅनडाची असलेल्या नोराने मुंबईत येऊन आपले स्थान तर निर्माण केलेच त्याचबरोबरीने तिने कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमावली आहे. नोराचे मुंबईत आलिशान घर आहे, ज्याची किंमत सुमारे १० कोटी रुपये आहे. त्याचबरोबर या घराचे इंटीरियर पीटर मारिनोने डिझाइन केले आहे. तसेच नोराकडे व्हॅनिटी व्हॅन देखील आहे. तिच्याकडे अनेक लग्झरी कार आहेत.

नोरा कॅनडाहून फक्त ५ हजार रुपये घेऊन भारतात आली होती. त्यानंतर तिने येथे येऊन कठोर परिश्रम केले, त्यामुळेच ती हे स्थान मिळवू शकली आहे. नोराकडे एकूण ३० कोटी रुपयांची संपत्ती आहे. आज ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. तिच्या प्रत्येक गाण्याची चाहचे आतुरतेने वाट पाहाताना दिसतात. तिच्या मादक अदा चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकवताना दिसतात.

कामाविषयी बोलायचे झाले तर नोरा 'झलक दिखला जा' कार्यक्रमात परिक्षक म्हणून दिसत होती. त्यानंतर नोराने फिका वर्ल्ड कप २०२२मध्ये डान्स केला होता. तिच्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधले होते. तसेच २०० कोटी रुपये खंडणी प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी सुकेश चंद्रशेखरची नाव जोडण्यात आले होते. त्यापूर्वी नोरा ही अभिनेता अंगद बेदीला डेट करत होती. पण एक दिवस अचानक अंगदने नेहा धुपियाशी लग्न करत सर्वांनाच धक्का दिला. त्यानंतर नोरा आणि अंगदच्या नात्यात फूट पडली.

WhatsApp channel

विभाग