अशोक सराफ यांच्या पाठोपाठ निवेदिता यांची नवी मालिका, कधी आणि कुठे पाहाता येणार जाणून घ्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अशोक सराफ यांच्या पाठोपाठ निवेदिता यांची नवी मालिका, कधी आणि कुठे पाहाता येणार जाणून घ्या

अशोक सराफ यांच्या पाठोपाठ निवेदिता यांची नवी मालिका, कधी आणि कुठे पाहाता येणार जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 01, 2024 11:19 AM IST

निवेदिता सराफ यांची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ही मालिका कोणती आहे? मालिकेचा विषय काय आहे? चला जाणून घेऊया...

Aai Aani Baba Retire Hot Aahet
Aai Aani Baba Retire Hot Aahet

सध्या छोट्या पडद्यावर नव्या मालिकांचा धुमाकूळ सुरु आहे. एका पाठोपाठ एक अशा अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेते अशोक सराफ यांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. त्यांची अशोक मा. मा ही मालिका गाजली. त्यापाठोपाठ आता अशोक सराफ यांची पत्नी, निवेदिता सराफ यांची नवी मालिका येत आहे. निवेदिता यांना छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. आता त्यांची ही नवी मालिका काय आहे? ही मालिका कुठे प्रदर्शित होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

काय आहे मालिकेचे नाव?

निवेदिता सराफ यांच्या नव्या मालिकेचे नाव 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत!' असे आहे. मालिकेचे शीर्षक ऐकताक्षणीच आपल्या डोळ्यासमोर आपले आई-बाबा नक्कीच उभे रहातात. प्रत्येकाच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची मात्र तितकीच गृहित धरली जाणारी ही दोन हक्काची माणसं. आता आई-बाबांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काय असणार मालिकेची कथा?

'आई आणि बाबा रिटायर होत आहेत!' या मालिकेत आयुष्यभर खस्ता खाऊन आईवडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं करण्य. मुलं शिकून स्वत:च्या पायावर उभी रहातात, त्यांच्या संसारात रमूनही जातात. आई-वडील मात्र घरच्या जबाबदारीतून कधीही रिटायर होत नाहीत. मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांची नोकरी, त्यांचं लग्न आणि नंतर नातवंडं एकामागोमाग येणाऱ्या या जबाबदारीच्या चक्रात ते नकळतपणे अडकून जातात. आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका देखिल अश्याच एका जोडप्याभोवती फिरते ज्यांना खरतर घरच्या जबाबदाऱ्यांमधून निवृत्त तर व्हायचं आहे मात्र न संपणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये ते अडकले जातात. दिग्गज कलावंत निवेदिता सराफ आणि मंगेश कदम या नव्या मालिकेतून भेटीला येणार आहेत.
वाचा: पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर यांच्या 'चिमणी पाखरं'मधील अंजू आठवतेय का? वाचा सध्या काय करते

कधी सुरु होणार ही मालिका?

'आई आणि बाबा रिटायर होत आहेत! ' या मालिकेचा प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या प्रोमो मध्ये ही मालिका २ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजेच उद्या दुपारी २.३० वाजता प्रदर्शित होणार आहे. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत!' या मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पहायला मिळत आहे.

Whats_app_banner