अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावार प्रेक्षकांच्या मानावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे निवेदीता सराफ. एकेकाळी निवेदीता यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. आज त्या चित्रपटात फारश्या दिसत नसल्या तरी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. निवेदीता या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. नुकताच त्यांनी एक मॉलमध्ये वाईट अनुभव आल्याचे सांगितले आहे.
निवेदिता यांनी मालाडमधील एका फॉलचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी, 'नमस्कार, मी infinity 2 मालाड मधील MAX स्टोअरमध्ये होते. तेथील कर्मचार्यांचा मला खूप वाईट अनुभव आला, तुम्ही काही खरेदी केले की नाही याची त्यांना पर्वा नव्हती तसेच ते मदत करायला तयार नव्हते. एक मुलगी बाहेर आली आणि तिने दुसऱ्या सेल्समनला सांगितले की, तिच्याकडे वेळ नाही आणि ती निघून गेली, जेव्हा एका व्यक्तीने मला ओळखले तेव्हा त्याने माझी माफी मागितली आणि मॅनेजरला फोन केला. मी एक सेलिब्रिटी आहे म्हणून मला चांगली ट्रीटमेंट नको होती. पण मला चांगली ट्रीटमेंट हवी होती कारण मी एक सामान्य ग्राहक म्हणून तिथे गेले होते आणि त्या दुकानात पाऊल टाकणारी प्रत्येक व्यक्ती देखील तशीच जात असेल' असे कॅप्शन दिले आहे.
निवेदिता यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. एका यूजरने कमेंट करत 'हे अगदी खरे आहे, ग्राहक म्हणून प्रत्येकाला आदर दिला पाहिजे' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'अशी वागणूक प्रत्येक मॅक्समध्ये दिली जाते' असे म्हटले आहे.
निवेदिता यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्या सध्या 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत काम करताना दिसत आहेत. तसेच त्यांचे 'मी स्वरा आणि ते दोघं' या नाटकाचे प्रयोग सुरु आहेत. त्यांची 'अग्गबाई सासूबाई' ही मालिका विशेष गाजली होती. या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पंसतीला उतरली होती. निवेदिता यांचे बाळाचे बाप ब्रह्मचारी, तुझी माझी जमली जोडी, लपवा छपवी, आमच्या सारखे आम्हीच, बनवाबनवी अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
संबंधित बातम्या