Nitish Bharadwaj Daughters On Family Clashes: छोट्या पडद्यावरचे लोकप्रिय ‘श्रीकृष्ण’ अर्थात अभिनेते नितीश भारद्वाज यांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे वादळ आले आहे. ‘महाभारत’मध्ये श्रीकृष्णाने नात्यांसाठी अनेक लढाया लढल्या आणि नात्यांमधून अनेक लढाया जिंकल्या. पण, पडद्यावर ‘श्रीकृष्ण’ साकारणारे नितीश वास्तविक जीवनात मोठ्या ‘गृहयुद्धात’ अडकले आहेत. पहिलं लग्न मोडल्यानंतर, नितीश यांनी आयएएस अधिकारी स्मिता यांच्याशी दुसरे लग्न केले. दोघांना दोन मुली झाल्या. मात्र, नंतर त्यांच्याही नात्यात वितुष्ट येऊ लागले. अभिनेते नितीश भारद्वाज सध्या कठीण टप्प्यातून जात आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपल्या मुलींबद्दल सांगितले.
‘महाभारत’ मालिकेमध्ये श्रीकृष्ण साकारताना नितीश भारद्वाज यांनी लोकांना समजावून सांगितले की, कुटुंबापेक्षा अधिक महत्त्वाचे कोणीही नाही. पण, खऱ्या आयुष्यात नितीश भारद्वाज श्रीकृष्णाचे हे बोल सार्थ ठरवू शकले नाहीत. नितीश भारद्वाज यांनी त्यांची दुसरी पत्नी स्मिता विरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर ते प्रसिद्धीझोतात आले होते. अभिनेता नितीश भारद्वाज यांच्या वैयक्तिक आयुष्यात सध्या अनेक वाद सुरू आहेत. दरम्यान, नितीश कुटुंब आणि त्यांच्या नातेसंबंधांवर खोलवर बोलतांना दिसत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी आपल्या मुली कशा दुरावल्या, हे सागितले आहे.
अभिनेते नितीश भारद्वाज यांनी त्यांची आयएएस पत्नी स्मिता यांच्यापासून घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. दोघे २०१९पासून वेगळे राहत आहेत. काही दिवसांपूर्वी नितीश भारद्वाज यांनी आपल्या पत्नीने आपला मानसिक छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. आता त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली, ज्यामध्ये त्यांना तिसऱ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. पुन्हा लग्न करणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना नितीश म्हणाले की, या लग्नात त्यांना खूप अत्याचार सहन करावा लागला आहे. पत्नीपासून विभक्त झाल्यामुळे आता त्यांच्या दोन्ही मुली देखील दुरावल्या आहेत.
एका बापाचं दुःख सांगताना नितीश भारद्वाज म्हणाले की, ‘माझ्या ११ वर्षांच्या मुली मला म्हणाल्या की, त्यांना मला स्वतःचा बाबा म्हणायची लाज वाटते. त्या माझा तिरस्कार करतात. या गोष्टी जेव्हा माझ्या मुलींनी मला बोलून दाखवल्या तेव्हा, माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला खूप मोठा धक्का बसला. मला आश्चर्य वाटले की, मुलींसाठी सर्व काही करूनही त्या असे का बोलत आहेत? कदाचित आपले पालक विभक्त होतायत, या विचारानेच त्यांच्यावर परिणाम झाला असेल.’
संबंधित बातम्या