Nitin Chauhan Passes Away : मनोरंजन सृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. 'दादागिरी २' या रियॅलिटी शोचे विजेतेपद पटकावणारा टीव्ही अभिनेते नितीन चौहान याचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. उत्तर प्रदेशातील अलिगड येथील रहिवासी असलेल्या नितीन याने वयाच्या अवघ्या ३५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 'दादागिरी २' जिंकल्यानंतर नितीनला मोठी ओळख मिळाली. याशिवाय नितीन एमटीव्हीच्या 'स्प्लिट्सव्हिला ५', 'Zindagi.com', 'क्राईम पेट्रोल' आणि 'फ्रेंड्स' या मालिकांमध्ये झळकला आहे. अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
अभिनेता नितीन चौहान २०२२मध्ये सब टीव्हीवरील 'तेरा यार हूं मैं' या मालिकेत दिसला होता. नितीनच्या निधनाच्या वृत्ताला त्याचे सहकलाकार सुदीप साहिर आणि सायंतनी घोष यांनी दुजोरा दिला आहे. मात्र, यापेक्षा अधिक माहिती त्यांनी शेअर केलेली नाही. नितीनची माजी को-स्टार विभूती ठाकूर हिने केलेल्या पोस्टनुसार, त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
याशिवाय विभूतीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नितीनसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलं की, ‘देव तुझ्या आत्म्याला शांती देवो. हे वृत्त ऐकून खरंच धक्का बसला आणि मी दु:खी झालेय, मला आशा होती की, तुझ्यात इतकी ताकद होती की, तू सगळ्या समस्यांना तोंड देऊ शकशील... मला वाटत होतं की, तू मानसिकदृष्ट्या मजबूत असशील, अगदी तुझ्या शरीरासारखा…’
नितीनचे वडील आपल्या मुलाचे पार्थिव घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या नितीनचे वडील किंवा त्याचे कुटुंबीय किंवा पोलिसांकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. नितीनच्या मृत्यूच्या कारणाबाबत बोलायचे झाले तर, अभिनेत्याचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र त्याने आत्महत्या केल्याचेही बोलले जात आहे. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत, मात्र अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
नितीनने आत्महत्या केल्याचे पोलिस तपास करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीनचे वडील मुंबईत आले आहेत आणि अभिनेत्याचे पार्थिव अलिगडला घेऊन जाणार आहेत. मात्र, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अद्यापपर्यंत पोलीस किंवा कुटुंबीयांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. आता सगळेच चाहते अभिनेत्याला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत.