अभिषेक बच्चनसोबतच्या अफेअरच्या अफवांमुळे निमरतने केलेले ते वक्तव्य चर्चेत, पाहा काय म्हणाली?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अभिषेक बच्चनसोबतच्या अफेअरच्या अफवांमुळे निमरतने केलेले ते वक्तव्य चर्चेत, पाहा काय म्हणाली?

अभिषेक बच्चनसोबतच्या अफेअरच्या अफवांमुळे निमरतने केलेले ते वक्तव्य चर्चेत, पाहा काय म्हणाली?

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 06, 2024 07:34 AM IST

Nimrat Kaur: निमरत कौरची एक नवी मुलाखत समोर आली आहे ज्यात अभिनेत्री तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल सांगत आहे.

निम्रत  कौर
निम्रत कौर

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री निमरत कौरचं नाव बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनशी जोडले जात आहे. असे म्हटले जात आहे की, निमरतचे अभिषेकसोबत अफेअर आहे. मात्र, यावर कोणीही भाष्य केलेले नाही. पण आता निमरतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तिने ती रिलेशनशीपमध्ये आहे की सिंगल आहे याविषयी खुलासा केला आहे. आता निमरत नेमकं काय म्हणाली असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

निमरत नुकतीच सिटाडेल हनी बनी या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचली होती. यावेळी निमरतने झूम टीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये निमरतने तिच्या सिंगल स्टेटसबद्दल संकेत दिले. मुलाखतीमध्ये निमरतला विचारण्यात आले की, बर्याचदा सुट्टीवर जाते, मग सिंगल गर्ल्सना काय टिप्स देऊ इच्छिते? हे सांगायला सुरुवात करताच व्हिडिओ पुढे थांबतो.

या अफेअरच्या बातम्या चुकीच्या असल्याचेही अप्रत्यक्षपणे समोर आले आहे. मात्र ही बातमी व्हायरल झाल्यापासून अभिनेत्रीला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. त्याचबरोबर तिच्या काही चाहत्यांनी पाठिंबा देखील दिला आहे.

निमरतच्या कामाविषयी

निमरतच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती गेल्या सजनी शिंदेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसली होती ज्यात तिने इन्स्पेक्टर बेला बारोटची भूमिका साकारली होती. आता ती सेक्शन ८४ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अभिषेक बॅनर्जी आणि डायना पेंटी यांच्याही भूमिका आहेत.
वाचा: 'आय वॉन्ट टु टॉक' चित्रपटामध्ये बदललेला दिसला अभिषेक बच्चन, पाहा ट्रेलर

अभिषेकच्या कामाविषयी

अभिषेकबद्दल बोलायचे झाले तर नुकताच त्याच्या आगामी 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय तो हाऊसफुल ५ मध्येही झळकणार आहे.

Whats_app_banner