मालिकांविश्वांमध्ये सध्या अनेक नवनव्या विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे दिसत आहे. जुन्या मालिका बंद होऊन त्यांची जागा नव्या मालिका घेत असल्याचे चित्र आहे. झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या मालिकेने देखील प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यापूर्वी या कार्यक्रमाचा लेखक, सूत्रसंचालक डॉ निलेश साबळेने रामराम ठोकला होता. त्यानंतर निलेश साबळे एक नवा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या कार्यक्रमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
कलर्स मराठी आता विनोदाचा ॲटमबॅाम्ब फोडण्यासाठी निलेश साबळे सज्ज झाला आहे. त्याचा ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा कार्यक्रम तगडी स्टारकास्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमातून निलेश साबळे, ओमकार भोजने आणि भाऊ कदम हे कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडणार आहेत. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण आता या कार्यक्रमाच्या प्रदर्शनाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
वाचा: सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचं CCTV फुटेज आलं समोर, आरोपी दुचाकीवरून आला अन्...
सुरुवातीला ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर करत प्रदर्शनाची २० एप्रिल ही तारीख जाहिर करण्यात आली होती. पण आता तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. कलर्स मराठी वाहिनीने या कार्यक्रमाचा दुसरा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमाच्या प्रदर्शनाची तारीख २७ एप्रिल सांगण्यात आली आहे. त्यामुळे २० एप्रिलला सुरु होणारा कार्यक्रम आता २७ एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे ऐकून चाहत्यांचा हिरमोड नक्की झाला आहे.
वाचा: 'तारक मेहता..' मालिकेतील सोनूचा एअरपोर्टवर अतरंगी कारनामा, काही सेकंदामध्येच तयार केला टॉप
‘हसताय ना ?हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमात अभिनेते भरत जाधव आणि अभिनेत्री अलका कुबल हे दोन कलाकार परिक्षक म्हणून दिसणार आहेत. ते कार्यक्रमातील कलाकारांची दाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच भाऊ कदम, ओंकार भोजने, सुपर्णा श्याम, रोहित चव्हाण आणि स्नेहल शिदम हे कलाकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करणार आहेत.
वाचा: बॉक्स ऑफिसवर 'बडे मियां छोटे मियां' सिनेमाचा धुमाकूळ, तीन दिवसातच कमावले इतके कोटी
संबंधित बातम्या