मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  चला हवा येऊ द्या आमच्यासाठी भावनिक शो; ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’चा प्रोमो पाहून नेटकरी भावूक

चला हवा येऊ द्या आमच्यासाठी भावनिक शो; ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’चा प्रोमो पाहून नेटकरी भावूक

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 04, 2024 03:03 PM IST

अभिनेता निलेश साबळेचा ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा नवा कोरा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पूर्वी त्याचा चला हवा येऊ द्या हा शो प्रेक्षकांची मने जिंकत होता. आता या नव्या शोचा प्रोमो पाहून नेटकरी भावूक झाले आहेत.

चला हवा येऊ द्या हे आमच्यासाठी...; ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’चा प्रोमो पाहून नेटकरी भावूक
चला हवा येऊ द्या हे आमच्यासाठी...; ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’चा प्रोमो पाहून नेटकरी भावूक

झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळेने एग्झिट घेताच काही दिवसांमध्ये शो बंद करण्यात आला. त्यानंतर आता निलेश साबळे 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' हा नवा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या कार्यक्रमाचा प्रोमो पाहून नेटकरी भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या नव्या कार्यक्रमाचे दिग्दर्शन, लेखन आणि सूत्रसंचालन अशी जबाबदारी निलेश साबळेच्या अंगावर टाकण्यात आली आहे. तसेच नुकताच या शोचा प्रोमो देखील शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहून नेटकरी भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
वाचा: ‘या’ सेलिब्रिटीने घेतलं ईशा अंबानी-आनंद पिरामल याचं अमेरिकेतील घर, ५०० कोटी रुपयांचा केला करार

नेटकरी झाले भावूक

'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमाच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने, 'एकसाथ तीन एक्के बाजी मारणार पक्के, खुप शुभेच्छा' अशी कमेंट केली आहे. तर, दुसऱ्या एका यूजरने, "आमच्यासाठी चला हवा येऊ द्या हे इमोशन आहे" अशी प्रतिक्रिया दिली आहे. तिसऱ्या एका यूजरने, "एकाने कोणताच कार्यक्रम आणि नवं चॅनेल चला हवा येऊ द्या याला रिप्लेस करू शकणार नाही" असे म्हटले. काही प्रेक्षकांनी आम्हाला बिग बॉस मराठी हवं अशी मागणी केली आहे.
वाचा: बनीने आकाशला दिला बाबा म्हणून आवाज, 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेमध्ये नवे रंजक वळण

कोणते कलाकार दिसणार?

'हसताय ना? हसायलाच पाहिजे' हा कार्यक्रम नेमका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, दिग्दर्शन आणि लेखन हे निलेश साबळे करत आहे. तसेच भाऊ कदम, ओंकार भोजने, सुपर्णा श्याम, रोहित चव्हाण आणि स्नेहल शिदम हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा कार्यक्रम शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता २० एप्रिल पासून सुरु होणार आहे. कार्यक्रम प्रदर्शित झाल्यानंतर त्यात काय पाहायला मिळणार हे स्पष्ट होणार आहे.
वाचा: पत्नीच्या त्रासाला कंटाळून शेफ कुणाल कपूर याने घेतला घटस्फोट, १६ वर्षांचा संसार मोडला

IPL_Entry_Point