काही वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने न्यूड फोटोशूट केले होते. त्यामुळं ते वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. इतकंच नाही तर त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. रणवीर सिंगनंतर आता एका अभिनेत्रीने न्यूड फोटोशूट केले आहे. अभिनेत्रीने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केले आहेत. आता ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
अर्धनग्न अवस्थेत फोटोशूट करणारी ही अभिनेत्री म्हणजे निकिता घाग आहे. तिने सोशल मीडियावर तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये निकिताने ट्रेंच कोटसह बूट घातलेले दिसत आहेत. तिने गळ्यात चोकर घातला असून केस हायपोनी स्टाईलने बांधलेले आहेत. पहिल्या दोन फोटोंमध्ये निकिता समोरच्या बाजूने बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोत निकिताने बाजूने बॉडी फ्लॉन्ट केली आहे. या फोटोंमध्ये निकिता हाताने आपले प्रायव्हेट पार्ट झाकताना दिसत आहे.
निकिताने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच तुफान व्हायरल झाले. पण नेटकऱ्यांनी निकिताला चांगलेच सुनावले आहे. निकिताच्या या फोटोंना काही यूजर्सने बोल्ड म्हटले आहे. तर काही यूजर्सने टीका केली आहे. एका यूजरने थेट निकिताची तुलना रणवीर सिंगशी केली आहे. 'तू रणवीर सिंगशी स्पर्धा करु शकत नाही' अशी थेट कमेंट केली आहे. एका यूजरने ‘हे असे फोटोशूट करणे योग्य नाही’ अशी कमेंट केली आहे. तर तिसऱ्या एका यूजरने ‘असे फोटोशूट करताना लाज वाटत नाही का’ असे म्हटले आहे. निकिताने सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेवर कमेंट केलेली नाही.
Phir Aayi Hasseen Dillruba Review: पंडीत करणार राणीचे आयुष्य उद्ध्वस्त! वाचा 'फिर है हसीन दिलरुबा'चा रिव्ह्यू
निकिता घागने ‘बेकाबू 3’, ‘एफ से फँटसी’ आणि ‘नशीला हुस्न’ सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. निकिता अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बोल्ड फोटो अपलोड करत असते. हे फोटो पाहून लोकांना रणवीरचे न्यूड फोटोशूट आठवले आहे. पेपर मॅगझिनच्या कव्हर स्टोरीसाठी रणवीर सिंगने न्यूड फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये रणवीर सिंग पूर्णपणे न्यूड दिसत होता. रणवीर सिंगचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले होते. या फोटोंमुळे लोकांनी रणवीरला जोरदार ट्रोल केले.