Nikki Tamboli-Arbaaz Patel Viral Video : अभिनेत्री निक्की तांबोळी सध्या प्रचंड चर्चेत आहे. निक्की तांबोळी ‘बिग बॉस ‘, ‘बिग बॉस ५’ आणि ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ११’मध्ये देखील दिसली आहे. निक्की ‘बिग बॉस मराठी ५’मुळे खूपच चर्चेत आली होती. या शोमध्ये निक्कीने केवळ तिच्या खेळानेच नव्हे, तर तिच्या लूकनेही सर्वांची मने जिंकली. सध्या निक्की तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे देखील चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी ५’चा स्पर्धक अरबाज पटेलसोबत तिचे नाव चर्चेत आले आहे. दोघेही डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. दरम्यान, निक्की आणि अरबाजचा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल नुकतेच दिवाळीच्या निमित्ताने एकत्र दिसले होते. यावेळी दोघेही एकत्र खूप आनंदी दिसत होते. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या डेटींगच्या बातम्यांना उधाण आले आहे. निक्की आणि अरबाजला एकत्र पाहून पापाराझींनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचे प्रयत्न केले. पापाराझींनी दोघांकडे बघून विचारले की, ‘अरबाज भाई, कसे आहात?’ यावर अभिनेता म्हणाला की, ‘आम्ही खूप छान आणि मजेत आहोत आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.’ यानंतर पॅप्प्स निक्कीकडे बघून म्हणाले की, ‘निक्की भाभी कशी आहेस?’. हे ऐकल्यानंतर निकीची प्रतिक्रिया पाहणे मनोरंजक होते. राग येण्याऐवजी निक्की तांबोळी लाजली.
यानंतर पापाराझींनी अरबाज पटेलला विचारले की, तो कोणता चित्रपट पाहायला आला आहे. निक्कीने सांगितले की, ते दोघेही 'भूल भुलैया ३' आणि 'सिंघम अगेन' हा चित्रपट पाहणार आहे. यानंतर त्यांनी दिवाळी कशी साजरी केली असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर अरबाज म्हणाला की, ‘कुटुंबासोबत आणि निक्कीसोबत माझी ही पहिलीच दिवाळी आहे.’ यानंतर ‘तुम्ही निक्कीला तुमच्या घरी कधी नेत आहात?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर अभिनेत्री स्वतः म्हणाली ली, ‘लवकरच’. यावर निक्कीनेही सगळ्यांना सांगितलं की, दोघांचे एकत्र गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अरबाजने एक्स गर्लफ्रेंड लिसा बिंद्रासोबत साखरपुडा केल्याची चर्चा होती. मात्र, या शोनंतर त्याने या अफवा फेटाळून लावल्या. त्याने सांगितले की, त्याचा कधीच साखरपुडा झाला नाही. त्यामुळे दोघांच्या लग्नाची चर्चा देखील अफवाच असल्याचे म्हटले जात आहे.