Marathi Natak : मालिका विश्व गाजवल्यानंतर निखिल चव्हाणची रंगभूमीवर एंट्री! एकाच वेळी गाजवणार दोन नाटकं
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Marathi Natak : मालिका विश्व गाजवल्यानंतर निखिल चव्हाणची रंगभूमीवर एंट्री! एकाच वेळी गाजवणार दोन नाटकं

Marathi Natak : मालिका विश्व गाजवल्यानंतर निखिल चव्हाणची रंगभूमीवर एंट्री! एकाच वेळी गाजवणार दोन नाटकं

Published Feb 08, 2025 09:42 AM IST

Marathi Natak : निखिलने आजवर अनेक मराठी मालिका, वेब सीरिज आणि चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

मालिका विश्व गाजवल्यानंतर निखिल चव्हाणची रंगभूमीवर एंट्री! एकाच वेळी गाजवणार दोन नाटकं
मालिका विश्व गाजवल्यानंतर निखिल चव्हाणची रंगभूमीवर एंट्री! एकाच वेळी गाजवणार दोन नाटकं

Nikhil Chavan Marathi Natak : सध्या मराठी रंगभूमीकडे प्रेक्षक वर्ग विशेष वळताना दिसत आहे. या झगमगत्या सिनेविश्वात आता नाटकांकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. केवळ कलाकार मंडळीच नव्हे तर, प्रेक्षकवर्ग ही रंगभूमीला प्राधान्य देताना दिसतोय. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्याची एकाच वेळी दोन नाटकं सुरू असून, तो रंगभूमी गाजवताना दिसत आहे. आणि हा मालिका विश्वातील मराठमोळा लोकप्रिय चेहरा म्हणजेच 'लागिरं झालं जी'मधून 'विक्या' म्हणून घराघरांत पोहचलेला निखिल चव्हाण आहे. निखिलने आजवर अनेक मराठी मालिका, वेब सीरिज आणि चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

एकाच वेळी दोन नाटकं गाजवणार!

आता रंगभूमी गाजवणाऱ्या देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित 'ऑल द बेस्ट' या नाटकातून तो रंगमंच गाजवणार आहे. या नाटकाच्या मूळसंचात अभिनेता अंकुश चौधरी याने साकारलेलं पात्र आता निखिल चव्हाण साकारताना दिसणार आहे. आजवर या नाटकाने शेकडो तगडे स्टार इंडस्ट्रीला दिले आहेत आणि आता यानंतर निखिलही त्याच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मन जिंकायला सज्ज झाला आहे. याशिवाय निखिल चव्हाण अभिनेता भरत जाधव यांच्याबरोबर 'तू तू मी मी' या नाटकांत रंगभूमीचा मंच शेअर करत आहे. भरत जाधव एंटरटेनमेंट निर्मित आणि केदार शिंदे लिखीत व दिग्दर्शित 'तू तू मी मी' या नाटकांत देखील निखिल चव्हाण, अंकुश चौधरीने साकारलेली भूमिका साकारत आहे.

Review : सत्याचा शोध घेणारं नाटक! 'द... अदर वर्ल्ड' सौंदर्यपूर्ण पंचतत्वाचा रंगमंचीय अनुभव

काय म्हणतोय निखिल चव्हाण?

या दोन्ही नाटकांबद्दल बोलताना निखिल म्हणाला की, 'आजवर मला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं आहे. आता मी रंगमंचावर परतलो असून, एक नाही तर दोन नाटक एकाचवेळी मी सादर करत आहे. 'ऑल द बेस्ट' हे नाटक कोणालाच नवं नाही आणि अशा गाजलेल्या नाटकांत मला काम करण्याची संधी मिळतेय हे माझं भाग्य आहे. 'ऑल द बेस्ट'मध्ये मी आंधळ्याची भूमिका साकारत आहे, जी बरीच चॅलेंजींग भूमिका आहे. देवेंद्र सर आणि मयुरेश पेमने खूप उत्तम रित्या तालमी घेतल्यामुळे मला ते सहज सोपं झालं.भरत जाधव सरांमुळे मी रंगभूमीशी जोडला गेलो. आजवर साऱ्या प्रेक्षकांनी माझ्या कामाचं नेहमीच कौतुक केलं आहे आणि आता रंगमंचावरीलही माझ्या अभिनयाला तशीच दाद मिळेल अशी आशा करतो.'

Harshada Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner