international celebs: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा शुक्रवारी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला. या सोहळ्याला आंतरराष्ट्रीय कलाकारांनी देखील हजेरी लावली. हे कलाकार कोणते जाणून घेऊया..
(1 / 6)
१२ जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला किम कार्दशियन, क्लोई कार्दशियन, जॉन सीना, रेमा, निक जोनास यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पाहा त्यांचे खास फोटो…
(2 / 6)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला किम कार्दशियन आणि क्लोई कार्दशियन पोज देताना दिसत होते. किमने चमकदार लाल रंगाचा लेहंगा-साडी परिधान केली होती, तर क्लोईने सोनेरी रंगाची साडी नेसली आहे.(PTI)
(3 / 6)
मुंबईतील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या दिवशी निक जोनासने प्रियांका चोप्रासोबत रेड कार्पेटवर फोटो काढले. दोघांचाही लूक पाहण्यासारखा आहे. (REUTERS)
(4 / 6)
अभिनेता शाहरुख खानने हॉलिवूड अभिनेता जॉन सीनासोबत पोझ दिली. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
(5 / 6)
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पोहोचताच कुस्तीपटू आणि अभिनेता जॉन सीना फोटोसाठी पोझ देत आहे. (ANI Photo)
(6 / 6)
कॅनेडियन गायक आणि रॅपर एपी ढिल्लन अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला उपस्थित होता. (PTI)
(7 / 6)
लेखक आणि लाइफ कोच जय शेट्टी आणि पत्नी राधी देवलुकिया फोटोंसाठी पोज देतात. (PTI)