Sonakshi Sinha Baby Panning: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत ८ वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न गाठ बांधली आहे. या कपलचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. सोनाक्षी-झहीरने २३ जून २०२४ रोजी नोंदणीकृत लग्न केले. कोणत्याही स्वप्नवत ठिकाणी फार डामडौल न करता आपल्या शहरात कुटुंबासमवेत हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नानंतर ही जोडी कधी खुशखबर देणार याची अनेक चाहते वाट पाहत आहेत.
सध्या सगळेच सोनाक्षीला तिच्या गुडन्यूज विषयी प्रश्न विचारत आहेत. आता झूमशी बोलताना अभिनेत्रीने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांना जेव्हा विचारण्यात आले की, ते कुटुंब नियोजनाबद्दल काय विचार करत आहेत आणि त्यांनी अद्याप मुले होऊ देण्याचा विचार केला आहे का?, तेव्हा सोनाक्षी लगेच म्हणाली की, ‘हा प्रश्न आमच्या पालकांनी अद्याप आम्हाला विचारलेला नाही.’ सोनाक्षी म्हणाली की, ‘सध्या आम्ही आमच्या वैवाहिक नात्याचा आनंद घेत आहोत. आम्हा दोघांनाही मुले आवडतात आणि मुलांचे नियोजन केव्हा करायचे हे आम्हाला चांगलेच माहित आहे.’
याबद्दल बोलताना सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, साहजिकच एकदा मूल जन्माला आले की सर्व काही बाळाभोवती फिरेल. पण, सध्या आम्हाला आमचे वैवाहिक जीवन एन्जॉय करायचे आहे.' शत्रुघ्न सिन्हा यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा सोनाक्षी त्यांना भेटण्यासाठी अनेकदा रुग्णालयात येताना दिसली होती. त्यानंतर सोनाक्षी गंमतीने म्हणाली की, आता आम्ही हॉस्पिटलमध्येही जाऊ शकत नाही, कारण जेव्हा जेव्हा मी जाते तेव्हा लोकांना वाटते की मी गरोदर आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सोनाक्षी सिन्हाचा ‘डबल एक्सएल’ हा चित्रपट खूप आवडला होता. यानंतर संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेब सीरिजमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती, ज्याचं खूप कौतुक झालं होतं. नुकताच तिचा ‘काकुदा’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तिचा हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता पुन्हा एकदा सोनाक्षी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.