New Year 2024 Upcoming Web Series: येत्या नव्या वर्षात अनेक बहुप्रतीक्षित वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये अनेक वेब सीरिजचे नवे सीझन्स रिलीज होणार आहेत. अर्थात नव्या वर्षात काही गाजलेल्या वेब सीरिजचं कथानक पुढे सरकताना दिसणार आहे. 'मिर्झापूर ३', 'आश्रम ४', 'पंचायत ३', 'असुर ३' अशा अनेक बहुप्रतीक्षित वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रेक्षक देखील या सीरिजची वाट बघत आहेत. चला तर, बघूया नव्या वर्षात कोणत्या वेब सीरिज रिलीज होणार आहेत...
लोकप्रिय वेब सीरिज 'पंचायत'चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'पंचायत ३' येत्या नव्या वर्षात अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. अद्याप याची रिलीज डेट जाहीर करण्यात आली नसली, तरी लवकरच ही वेब सीरिज रिलीज होईल, असे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे.
'आश्रम' या वेब सीरिजमधून अभिनेता बॉबी देओल याने धमाकेदार कमबॅक केला होता. त्याची ही धमाकेदार वेब सीरिज प्रेक्षकांना देखील खूप आवडली होती. आता या सीरिजचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या वर्षात पुन्हा एकदा बॉबी देओल आपला जलवा दाखवणार आहे.
अरशद वारसी आणि वरुण सोबती यांची ही गाजलेली वेब सीरिज आता नवं पर्व घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात 'असुर' नव्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अद्याप यावर शिक्कामोर्तब झाला नसला तरी ही सीरिज देखील २०२४मध्ये रिलीज होईल, असे म्हटले जात आहे.
पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदु शर्मा, श्रिया पिळगांवकर यांच्या दमदार भूमिका असलेली 'मिर्झापूर' ही वेब सीरिज देखील नवा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सीझनमध्ये पुन्हा एकदा मिर्झापूरचा थरार पाहायला मिळणार आहे. २०२४च्या सुरुवातीलाच ही वेब सीरिज रिलीज होणार आहे.
शाहिद कपूर आणि विजय सेतुपती यांच्या 'फर्जी'चा दुसरा सीजन देखील लवकरच रिलीज होणार आहे. या दुसऱ्या सीझनची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र, याचा दुसरा सीझन लवकरच येणार असल्याचे निर्मात्यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या