Kareena Kapoor Khan New Year 2024 Celebration: बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर खान हिने पती सैफ आणि दोन्ही मुलं तैमूर व जेहसह नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. करीना कपूर खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करून त्याची झलक दाखवली होती. संपूर्ण जगाने काल २०२३ या वर्षाला निरोप दिला आणि त्यासोबतच नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत केलं. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही नववर्षाचे जोरदार स्वागत केले. मात्र, या दरम्यान करीना आणि तिच्या कुटुंबाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
करीना कपूरने आपल्या कुटुंबासह २०२४ या नवीन वर्षाचे स्वागत केले. २०२३ला निरोप देत आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना करीना कपूर खानने तिच्या कुटुंबासोबतचे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री रंगीबेरंगी मखमली शरारा सूट परिधान करून अतिशय सुंदर दिसत आहे. तिने केसांमध्ये लाल गुलाब माळले आहेत आणि सुंदर मेकअप केला आहे. करीनाने केसांना बन स्टाईलमध्ये बांधून तिचा हा लूक पूर्ण केला आहे. करीनाचा पती आणि अभिनेता सैफ अली खान पांढरा शर्ट आणि टाय सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. दोघांनी मिरर सेल्फी घेत चाहत्यांना याची झलक दाखवली आहे.
दुसऱ्या, एका फोटोत सैफ आणि करीना त्यांची दोन मुले तैमूर आणि जेहसोबत दिसत आहेत. तैमूर सूट आणि बूटमध्ये खूप गोंडस दिसत आहे, तर जेह निळ्या स्वेटरमध्ये खूप क्युट दिसत आहे. सैफ आणि करीना त्यांचे फोटो काढण्यात व्यस्त दिसत आहेत. पहिला फोटो शेअर करताना तिले त्याला कॅप्शन दिले की, ‘तुम्ही तयार आहात का? आम्ही आहोत.’ तर, दुसऱ्या फोटोमध्ये तिने लिहिले की, ‘फ्रेम ३१-१२-२०२३.’
गेलं वर्ष करीनासाठी खूपच खास ठरलं. अभिनेत्री करीना कपूर खान हिचा ‘द क्रू’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात करीना कपूर तब्बू आणि क्रिती सेननसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’मध्येही करीना कपूर झळकणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, टायगर श्रॉफ, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि अक्षय कुमार देखील दिसणार आहेत.
संबंधित बातम्या