गेल्या काही दिवसांपासून मालिका विश्वामध्ये धुमाकूळ सुरु आहे. अनेक नव्या मालिका सुरु होत आहेत. काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. सध्या सोशल मीडियावर एका मालिकेचा प्रोमो व्हायरल झाला आहे. कारण ही मालिका एका अतिशय वेगळ्या विषयावर आधारित आहे. या मालिकेचे नाव 'बाईपण भारी रं' असे आहे. आता या मालिकेत नेमकं काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, असं अनेकदा म्हटलं जातं. जगभरातल्या अनेक कर्तृत्ववान महिलांच्या सक्सेस स्टोरी तुम्ही नक्कीच ऐकल्या असतील. मनोरंजन क्षेत्रातही बाईपणावर आधारित असलेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. अशातच आता बायकांच्या मनातील गुजगोष्टी जाणून घेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिग्दर्शक केदार शिंदे प्रयत्न करत आहेत. 'बाईपण भारी रं' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बाईपण भारी रं' मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये बॅकग्राऊंडला दमदार अभिनयकौशल्य आणि तितकच दिलखुलास व्यक्तीमत्त्व असणाऱ्या वंदना गुप्तेंचा आवाज ऐकू येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता या मालिकेची उत्सुकता आहे. तसेच या मालिकेत कोणते कलाकार झळकणार हे जाणून घेण्यासदेखील प्रेक्षक उत्सुक आहेत.
'बाईपण भारी रं' या मालिकेच्या माध्यमातूनही महाराष्ट्रातील तमाम महिलावर्गाला एक खास सरप्राईज मिळणार आहे. तुमच्या आमच्यातल्या बायकांची कथा या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे ही मालिका प्रत्येक स्त्रीला आपली वाटेल. त्यामुळे मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.
वाचा: ७० दिवसातच ‘बिग बॉस मराठी ५’ घेणार प्रेक्षकांचा निरोप? 'या' दिवशी होणार फिनाले
'बाईपण भारी रं' या मालिकेच्या आधी ‘आई तुळजाभवानी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका ३ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी, ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. तसेच आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती म्हणजे '#लय आवडतेस तू मला.' या मालिकेत एक प्रेम कथा पाहायला मिळणार आहे. पण ही मालिका कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याविषयी माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.