New Serial: द्वेषात फुलणारी एक झन्नाट प्रेमकथा! एक वेगळी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला-new upcoming serial hashtag lay awdte tu mla ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  New Serial: द्वेषात फुलणारी एक झन्नाट प्रेमकथा! एक वेगळी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

New Serial: द्वेषात फुलणारी एक झन्नाट प्रेमकथा! एक वेगळी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 22, 2024 03:56 PM IST

New Serial: कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना द्वेषात फुलणारी लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रोमो पाहून सर्वजण उत्सुक झाले आहेत.

New Serial
New Serial

सध्या मालिका विश्वात जणू काही धुमाकूळ सुरु आहे. एकापाठोपाठ एक अशा नव्या मालिकांची घोषणा सुरु आहे. पण या मालिकांचे विषय हे अतिशय वेगळे आणि उत्सुकता वाढवणारे असल्याचे प्रोमो पाहिल्यावर सिद्ध होते. अशातच कलर्स मराठी वाहिनीवर आणखी एका मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत एक लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. पण ही लव्हस्टोरी थोडी वेगळी आहे. कारण या कपलमध्ये प्रचंड द्वेष असणार आहे. आता ही आगळीवेगळी प्रेमकहाणी पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

महाराष्ट्राच्या संस्कृतीत प्रेमकथांनी नेहमीच एक खास स्थान मिळवलं आहे. अनेक अविस्मरणीय प्रेमकथांनी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलंय. पण आता महाराष्ट्राच्या मातीतली अशी एक प्रेमकथा येतेय, जी ना कधी पाहिली, ना कधी ऐकली. हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर कोरली जाणारी, काळजाला भिडणारी अशी ही प्रेमकथा '#लय आवडतेस तू मला' या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे शिर्षकही अतिशय हटके आहे.

काय आहे मालिकेची कथा?

अस्सल गावच्या मातीतली एक नवी कोरी अनोखी प्रेमकथा '#लय आवडतेस तू मला'चा जबरी प्रोमो समोर आला आहे. कळशी आणि साखरगाव या दोन जन्मोजन्मीचं वैर असलेल्या, एकमेकांच्या गावची वेस न ओलांडणाऱ्या दुष्मन गावांमधील एक रांगडी, झन्नाट प्रेमकथा प्रेक्षकांना '#लई आवडतेस तू मला' या मालिकेत पाहायला मिळेल. कळशी गावचा झुंजार गडी अर्थात सरकार साखरगावात आला अन् पाहताक्षणी साखरगावच्या साहेबवारांची लेक सानिकाच्या प्रेमात पडला. द्वेषात फुलणाऱ्या या रांगड्या प्रेमकथेची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. सरकार आणि सानिकाच्या या गावराण प्रेमकथेचा ठसका पाहायला अवघा महाराष्ट्र आतुर आहे.
वाचा: अख्खा हिंदुस्तान गाजवला, आता पुण्याला नादवणार; 'फुलवंती' सिनेमाचा लक्षवेधी टीझर प्रदर्शित

कोणते कलाकार दिसणार?

'#लय आवडतेस तू मला' या मालिकेच्या माध्यमातून एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सानिका मोजर आणि तन्मय जक्का हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या नव्या जोडीची लव्हस्टोरी पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. '#लय आवडतेस तू मला' ही मालिका तरुणांना आकर्षित करण्यासह प्रत्येक वयोगटातील मंडळींना आपलंसं करणारी आहे. या

Whats_app_banner
विभाग