दर आठवड्याला काही नवीन चित्रपट किंवा वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात. नेटफ्लिक्सपासून ते प्राईम व्हिडीओ, सोनी लिव्ह आणि जिओ सिनेमापर्यंतया ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी दररोज येत असतात. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात अनेक नवीन कंटेंट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बरेच दिवस चाहते यापैकी काही चित्रपट आणि सीरिजची वाट पाहत होते. तुम्ही हे बहुचर्चित वेब सीरिज आणि चित्रपट पाहिले आहेत का? नाही? मग, संपूर्ण कुटुंबासह नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपट आणि वेब सीरिजचा आनंद तुम्ही घरबसल्या घेऊ शकणार आहात. पाहा काय काय रिलीज झालंय...
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट ११ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. असे बरेच लोक आहेत, ज्यांनी चित्रपटगृहात हा चित्रपट पाहिला नसावा. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल, तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात? हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात आला आहे. हा चित्रपट आपल्या कुटुंबासह आजच बघा.
ग्लेन पॉवेल आणि ॲड्रिया अर्जोना स्टारर कॉमेडी चित्रपट 'हिट मॅन' देखील ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंत या चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत होते. तुम्हीही यापैकी एक असाल, तर तुमची ही प्रतीक्षा आता संपली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट 'मैदान' ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट सय्यद अब्दुल रहीमचा बायोपिक आहे, जो फुटबॉलवर आधारित आहे. हा चित्रपट ११ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. जर तुम्ही अजून 'मैदान' बघू शकला नसाल, तर लगेच ओटीटीवर लगेच बघा.
TVFची 'गुल्लक' ही एक फॅमिली ड्रामा वेब सीरिज आहे, ज्याचे आतापर्यंत तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. चाहत्यांनीही त्याला खूप पसंती दिली आहे. आता 'गुल्लक ४' सोनी लिव्हवर प्रदर्शित झाला आहे. लोकांना ही सीरिज खूप आवडत आहे.
विक्रांत मेस्सी, सुनील ग्रोव्हर आणि मौनी रॉय स्टारर चित्रपट 'ब्लॅकआउट' हा एक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात विक्रांत मेस्सी बऱ्याच काळानंतर एका वेगळ्या भूमिकेत दिसला आहे. 'ब्लॅकआउट' ७ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर स्ट्रीम करण्यात आला आहे.
जर तुम्हाला कोरियन चित्रपट किंवा मालिका पाहण्याची आवड असेल, तर तुमच्यासाठी नेटफ्लिक्सवर 'हायरार्की' नावाची एक नवीन वेब सीरिज आली आहे, ती नक्की पाहू शकता. रोह जेओंग-ई, ली चे-मिन, किम जे-वोन, जी हे-वोन आणि ली वॉन-जंग यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या वेब सीरिजची कथा खूपच मनोरंजक आहे.
प्रणव मोहनलाल, ध्यान श्रीनिवासन आणि निविन पॉली स्टारर चित्रपट 'वर्षंगलक्कू शेषम' ७ जून रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट मल्याळम भाषेत आहे. हा कॉमेडी ड्रामा चित्रपट तुमचं नक्कीच मनोरंजन करेल.
संबंधित बातम्या