मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  OTT New Release: ओटीटीवर एकाच दिवशी प्रदर्शित होणार तब्बल ८ सिनेमे अन् वेब सीरिज, तारीख नोट करा!

OTT New Release: ओटीटीवर एकाच दिवशी प्रदर्शित होणार तब्बल ८ सिनेमे अन् वेब सीरिज, तारीख नोट करा!

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 14, 2024 07:53 PM IST

OTT Release on Friday: शुक्रवारी वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना मेजवानी मिळणार आहे. त्यामुळे कोणते सिनेमे आणि सीरिज प्रदर्शित होणार हे जाणून घ्या...

ओटीटीवर एकाच दिवशी प्रदर्शित होणार तब्बल ८ सिनेमे अन् वेब सीरिज, तारीख नोट करा!
ओटीटीवर एकाच दिवशी प्रदर्शित होणार तब्बल ८ सिनेमे अन् वेब सीरिज, तारीख नोट करा!

Upcoming OTT Release: सध्या ओटीटीवर विश्वावर सर्वात जलद आणि सर्वाधिक कंटेन्ट प्रदर्शित होताना दिसत आहे. वेगवेगळ्या विषयावर आधारित चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होताना दिसतात. काही चित्रपट असे असतात जे थेट ओटीटीवर प्रदर्शित होतात तर काही असे आहेत जे थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन मग ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. प्रेक्षकांना घरबसल्या हे चित्रपट पाहाता येतात. त्यामुळे येत्या शुक्रवारी कोणते चित्रपट आणि सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

येत्या १५ मार्चला नेटफ्लिक्स, डिस्ने प्लस हॉटस्टार, सोनी लिव, झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणते चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार हे थोडक्यात जाणून घेऊया...
वाचा: 'तो काय काम करतो हे मलाही...', सेलिब्रिटींसोबत दिसणाऱ्या ऑरीबाबत रणवीरचे वक्तव्य

नेटफ्लिक्स

१५ मार्च म्हणजेच शुक्रवारी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तीन नवे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामधील पहिला चित्रपट म्हणजे पंकज त्रिपाठीचा 'मर्डर मुबारक' आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. त्यानंतर कोरियन चित्रपट चिकन नगेट देखील प्रदर्शित होणार आहे. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा 'लाल सलाम' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
वाचा: 'दर दोन मिनिटाला मांड्या दाखवते', किरण खेर मलायका अरोरावर संतापल्या

डिस्ने प्लस हॉटस्टार

नेटफ्लिक्स प्रमाणे डिस्ने प्लस हॉटस्टारवर देखील काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये तेलुगू वेब सीरिज 'सेव द टायगर्स २'चा समावेश आहे. तसेच पंजाबी चित्रपट 'कॅनी ऑन जट्टा ३' आणि हॉलिवूडची प्रसिद्ध गायिकेचा कॉन्सर्ट 'टेलर स्विफ्ट ग एरस टूर' प्रदर्शित होणार आहे.
वाचा: 'तारक मेहता'मधील बबिता आणि टप्पूचा झाला साखरपुडा?

सोनी लिव्ह

सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर शुक्रवारी दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता ममूटीचा मल्याळम चित्रपट 'ब्रह्मयूग' प्रदर्शित होणार आहे.

झी ५

बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणारा 'हनुमान' हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

IPL_Entry_Point

विभाग