आईचं प्रेम मरणानंतरही संपत नाही! आईची माया सांगणारी गोष्ट 'तुला जपणार आहे' येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आईचं प्रेम मरणानंतरही संपत नाही! आईची माया सांगणारी गोष्ट 'तुला जपणार आहे' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आईचं प्रेम मरणानंतरही संपत नाही! आईची माया सांगणारी गोष्ट 'तुला जपणार आहे' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Feb 01, 2025 11:58 AM IST

New Marathi TV Serial : मायेची साद जेव्हा देवी ऐकते, तेव्हा फक्त संरक्षण नाही तर चमत्कार घडतो अशी ही गोष्ट, प्रत्येक आईच्या आपल्या बाळासाठी असलेल्या भावनांची गोष्ट 'तुला जपणार आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आईचं प्रेम मरणानंतरही संपत नाही! आईची माया सांगणारी गोष्ट 'तुला जपणार आहे' येणार प्रेक्षकांच्या भेटीला
आईचं प्रेम मरणानंतरही संपत नाही! आईची माया सांगणारी गोष्ट 'तुला जपणार आहे' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Tula Japnar Aahe : धमाकेदार मालिकांच्या भाऊगर्दीत आता आणखी एक नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या कथानकामुळे ही मालिका हटके आणि वेगळी ठरणार आहे. 'तुला जपणार आहे' या नव्या कोऱ्या मालिकेचा प्रोमो प्रसारीत झाला आणि प्रेक्षकांमध्ये या मालिकेची चर्चा रंगली. या मालिकेत कोणते कलाकार पाहायला मिळणार यांची सर्वांनाच उत्सुकता होती. तर या मालिकेतून झी मराठीवर शर्वरी लोहोकरे पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. तसेच, या मालिकेत नीरज गोस्वामी, प्रतीक्षा शिवणकर, मिलिंद फाटक, पूर्णिमा तळवलकर, निलेश रानडे ह्या तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.

काय आहे मालिकेचं कथानक?

'तुला जपणार आहे' ही कथा आहे, एका आईची असणार आहे. या आईचं नाव अंबिका असून, तिने आपल्या मुलीच्या संरक्षणाचं व्रत घेतलं आहे. आत्मारुपात ती तिच्या आजूबाजूला असणार आहे. परंतु, आत्मारुपात तिला तिच्या जाण्यानंतर घरातले बदललेले फासे व तिच्या मुलीच्या जीवावर उठलेले लोक आणि त्यांच्या दुष्ट मनीषा दिसू लागतात. तिच्या जाण्यानंतर मुलगी आणि वडिलांमध्ये झालेली ताटातूट या सगळ्याचा पाठलाग करत अंबिकाच्या प्रार्थनांना प्रतिसाद देत देवीने तिच्या मुलीच्या संरक्षणासाठी मीराला पाठवलं आहे.

Punha Kartavya Aahe: तनया-विशाखाचा नवा डाव मांडणार; वसुंधरा-आकाशच्या जीवाला धोका निर्माण होणार!

मालिकेत वापरलं जाणार व्हिएफएक्स तंत्रज्ञान!

मात्र, मीराची देवीवर नाराजी आहे, तिचा देवीवर विश्वास नाही. अशी मीरा आत्मारूपी अंबिकाला पाहू शकते, तिला स्पर्श करू शकते. तसंच, अंबिका तिच्यासोबत देवळाच्या पायऱ्याही चढू शकते. या दोघींच्या या नात्यामागचं गूढ काय असे? अंबिकाच्या मदतीला धावून आलेली मीरा कशी तिच्या मुलीच्या आयुष्यात येणार, हे पाहण्यासारखे असणार आहे. 'तुला जपणार आहे' ह्या हॉरर, थ्रिलर आणि फॅमिली ड्रामा असणाऱ्या या मालिकेतील प्रसंग आणि घटना अविश्वसनीय असणार आहेत. तसंच, या मालिकेचं आकर्षण आहे ते म्हणजे यात व्हिएफएक्स तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.

कधीपासून सुरू होणार मालिका?

या मालिकेतील व्हिएफएक्स बघण्या आणि अनुभवण्यासारखे असणार आहेत. अविस्मरणीय कथानकासोबतच डोळे दिपवणारी अशी ही भव्य मालिका असणार आहे. या मालिकेचं पटकथा लेखन चेतन सैंदाणे करत आहे आणि याचे संवाद पूर्णानंद वांढेकर यांनी लिहिले आहेत. तर, आयरिस प्रोडक्शन्सचे विद्याधर पाठारे मालिकेचे निर्माते आहेत. मायेची साद जेव्हा देवी ऐकते, तेव्हा फक्त संरक्षण नाही तर चमत्कार घडतो अशी ही गोष्ट, प्रत्येक आईच्या आपल्या बाळासाठी असलेल्या भावनांची गोष्ट 'तुला जपणार आहे’ या मालिकेतून १७ फेब्रुवारीपासून रात्री १०.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Whats_app_banner