Gharoghari Matichya Chuli new Serial: स्टार प्रवाह वाहिनीवर 'घरोघरी मातीच्या चुली' ही नवी मालिका १८ मार्च पासून सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी ही मालिका पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रेक्षकांनी मालिकेच्या प्रोमोवर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता मालिका येत्या काळात टीआरपी यादीमध्ये येणार की नाही हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमधअये जानकी आपल्या मुलीला गोष्ट सांगत असते. ती मुलीला सांगते की, देव बाप्पाने एका मुलीच्या आयुष्यात एका मुलाला पाठवले. त्या मुलाशी लग्न करून बायको म्हणून ती मुलगी घरी आली. जानकी हे सांगत असतानाच तिची सासू अर्थात सविता प्रभुणे या मोठ्या पगाराच्या नोकरीची पर्वा न करता तिने गृहिणी म्हणून होण्याचे ठरवले या तिच्या त्यागाचे कौतुक करत असतात.' त्यावर जानकी म्हणते, 'त्याग नाही निवड.'
वाचा: सगळ्यांचे मनापासून आभार; 'चला हवा येऊ द्या' बंद होताच कुशल बद्रिके झाला भावूक
सोशल मीडियावर 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेचा प्रोमो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका यूजरने 'नोकरी सोडून घर सांभाळते आहे म्हणून अभिमान आहे... आणि नसती नोकरी सोडली असती तर काय' असा प्रश्न निर्मात्यांना विचारला आहे. दुसऱ्या एका यूजरने, "नोकरी सोडून त्याग केला काय? मग ज्या नोकरी करतात त्या स्वार्थी आहेत का आणि हे असले उपदेशाचे डोस पाजणं तेव्हाच सोपं असते जेव्हा नवरा पैसेवाला असतो. हेच वाक्य अठराविश्वे दारिद्र्य असणाऱ्यांच्या घरी बोला" अशी संतापजनक कमेंट केली आहे.
वाचा: रात्र वैऱ्याची, अन् दार उघडं सताड; गौरव मोरेची उडाली घाबरगुंडी
'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळते. मालिकेत रेश्मा शिंदे, आरोही सांबरे, सविता प्रभुणे, सुमित पुसावळे, प्रमोद पवार, उदय नेने, आशुतोष पत्की, भक्ती देसाई, सुनील गोडसे हे कलाकार दिसत आहेत. या मालिकेने 'आई कुठे काय करते'ची जागा घेतली. त्यामुळे मालिका विषे। चर्चेत होती.