Netflix Top 5 Movies: थिएटरप्रमाणेच आता ओटीटीवर देखील चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळत आहे. प्रेक्षकांचा ओटीटीकडे वाढता कल पाहून अनेक चित्रपट देखील ओटीटीवर रिलीज केले जात आहेत. गेलं वर्ष एकंदरीतच मनोरंजन विश्वासाठी खास ठरलं आहे. २०२३मध्ये अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाले होते. या चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. यातील ५ चित्रपटांनी सध्या नेटफ्लिक्सच्या टॉप चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. चला तर बघूया, कोणते चित्रपट या यादीत सामील झाले आहेत...
नुकताच दिग्दर्शिका झोया अख्तरचा 'द आर्चिज' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाद्वारे शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, बोनी कपूर-श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांसारख्या अनेक स्टार किड्सनी फिल्मी दुनियेत पदार्पण केले आहे. या चित्रपटाने देखील टॉप चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
'जाने जान' या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिने डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. सस्पेन्सने भरलेल्या या मर्डर मिस्ट्री चित्रपटामध्ये करीनासोबत अभिनेता जयदीप अहलावत आणि विजय वर्मा यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.
या वर्षी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली निर्माती गुनीत मोंगा यांची डॉक्युमेंट्री फिल्म 'द एलिफंट व्हिस्पर्स' विशेष होती. या चित्रपटाने चित्रपट जगतातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जाणाऱ्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार पटकावला.
सिद्धार्थ मल्होत्राचा स्पाय थ्रिलर चित्रपट 'मिशन मजनू' देखील नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. या चित्रपटात सिद्धार्थसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसली होती. नेटफ्लिक्सच्या टॉप चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट आहे.
अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव स्टारर चित्रपट 'खो गये हम कहाँ' हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. मैत्रीचे बंध दाखवणारा निर्माता फरहान अख्तरचा हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यामुळेच 'खो गये हम कहाँ'चा देखील या यादीत समावेश झाला आहे.