मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Netflix: माधुरी दीक्षितने शोमध्ये आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्यामुळे नेटफ्लिक्सला नोटीस

Netflix: माधुरी दीक्षितने शोमध्ये आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्यामुळे नेटफ्लिक्सला नोटीस

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 28, 2023 09:01 AM IST

Netflix Gets Legal Notice: बिग बँग थिअरी या प्रसिद्ध शोमध्ये माधुरी दीक्षितबाबत (Madhuri Dixit) आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप करत नेटफ्लिक्सला नोटीस बजावण्यात आली आहे.

माधुरी दीक्षित
माधुरी दीक्षित (Instagram/@madhuridixtnene)

आजकाल नेटफ्लिक्सवर अनेक भारतीय चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे पाहायला मिळते. नुकताच माधुरी दीक्षितचा बिग बँग थिअरी हा शो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या शोमध्ये माधुरीने आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी केला आहे. या प्रकरणी मिथुन विजय कुमार यांनी नेटफ्लिक्सला नोटीस बजावली आहे.

मिथुन विजय कुमार यांनी एक ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी शोचा उल्लेख करत, 'मी काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवरील बिग बँग थिअरी या शोचा एपिसोड पाहिला. या पहिल्याच एपिसोडमध्ये बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्दांचा वापर करुन बोलताना दिसत आहे. माधुरीचा खूप मोठा फॅन आहे. त्यामुळे तिचे बिग बँग थिअरीमधील डायलॉग ऐकून मला वाईट वाटले. भारतीय संस्कृती आणि स्त्रियांचा अपमान केल्यासारखं वाटलं. म्हणून मी माझ्या वकिलाला नेटफ्लिक्सला कायदेशीर नोटीस पाठवण्यास सांगितले' असे म्हटले.
वाचा: LGBTQ विषयावर पहिल्यांदाच मराठीमध्ये चित्रपट, ‘या’ ओटीटीवर होणार प्रदर्शित

पुढे ते म्हणाले की, 'मी नेटफ्लिक्सला ओटीटी प्लॅटफॉर्मवरून तो एपिसोड काढून टाकण्याची विनंती केली. नेटफ्लिक्स हे प्रकरण गांभीर्याने घेईल, ही आशा व्यक्त करतो.' मिथुन यांच्या या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

बिग बँग थिअरीच्या दुसऱ्या सिझनमधील पहिल्या एपिसोडमध्ये जिम पार्सन्स (Jim Parsons)यानं शेल्डम कूपर ही भूमिका साकारली आहे. जिम पार्सन्स हा शोमध्ये माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांची तुलना करतो. त्यानंतर तो माधुरीबाबत एक कमेंट करतो. या कमेंटवर आता मिथुन विजय कुमार यांनी आक्षेप घेतला आहे.

WhatsApp channel

विभाग