Netflix Deleting Films and Web Series: तुम्हालाही घरी बसून चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्याची आवड आहे तर, ही बातमी तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी आहे. नेटफ्लिक्स प्रेमी असाल तर, काही चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्याची ही शेवटची संधी आहे. फेब्रुवारी महिन्यात नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवरून अनेक चित्रपट आणि वेब-सीरिज हटवले जाणार आहेत. नुकतीच नेटफ्लिक्स घोषणाही केली आहे. अनेक गाजलेले चित्रपट आणि वेब सीरिज फेब्रुवारी महिन्यात हटवले जाणार आहेत. आता नेटफ्लिक्सने इतका मोठा निर्णय का घेतला, याचे कारण देखील समोर आले आहे.
नेटफ्लिक्स प्रत्येक महिन्यात त्यांच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले काही चित्रपट आणि वेब सीरिज काढून टाकणार आहे. या महिन्यातही नेटफ्लिक्स असेच काही करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या अखेरीस नेटफ्लिक्सवरून २६ चित्रपट आणि वेब सीरिज काढून टाकण्यात येणार आहेत. आता या आधी जर, तुम्हाला हे चित्रपट आणि सीरिज बघायचा विचार करत असाल, तर या वीकेंडला नक्की थोडा वेळ काढा. बघा या यादीत तुमचे आवडते चित्रपट आणि वेब सीरिज आहेत का?
'एमटीव्ही फ्लोरिबामा नॉइज: सीझन १'
'कैदी'
'फादर स्टु' (२०२२)
'गूजबंप्स' (२०१५)
'चिकन रन' (२०००)
'प्रोमिथियस' (२०१२)
'रिअल स्टील' (२०११)
'ऑपरेशन फिनाले' (२०१८)
'अमेरिकन पिकर्स: सीझन १५' (२०१६)
'बॅबिलोन बर्लिन: सीझन १-३' (२०१८)
'मॉर्बियस' (२०२२)
'स्नोपायसर' (२०१३)
'द लास्ट ब्लॅक मॅन इन सॅन फ्रान्सिस्को' (२०१९)
'द ॲडव्हेंचर्स ऑफ शार्कबॉय अँड लावगर्ल' (२००५)
'डोन्ट वरी डार्लिंग' (२०२२)
'ड्रेड' (२०१२)
'डून' (२०२१)
'गुड बॉईज' (२०१९)
'लेजेंड्स ऑफ द फॉल' (१९९४)
'लोन सर्व्हायव्हर' (२०१३)
'पॉल ब्लार्ट: मॉल कॉप' (२००९)
'पॉल ब्लार्ट: मॉल कॉप २' (२०१५)
'रिप्ड' (२०१३)
'शी इज ऑल दॅट' (१९९९)
'शी इज द मॅन' (२००६)
'स्टँड बाय मी' (१९८६)