OTT Release in march: करोना काळापासून प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट पाहण्याबाबत अनेक गोष्टी बदलल्या आहेत. जास्त पैसे खर्च न करता घर बसल्या नवनवे चित्रपट पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल असतो. त्यामुळे ओटीटीवर कोणते नवे चित्रपट प्रदर्शित होत आहेत याबाबत जाणून घेण्यास प्रेक्षक आतुर असतात. चला जाणून घेऊया मार्च महिन्यात ओटीटीवर कोणते चित्रपट प्रदर्शित होणार.
१८ मार्च ते २४ मार्च या दरम्यान अनेक नवे आणि जुने हिट चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. नेटफ्लिक्स, झी ५, डिस्ने प्लस हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम या प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणते नवे जुने चित्रपट प्रदर्शित होणार चला जाणून घेऊया...
अभिनेत्री सारा अली खान महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'ऐ वतन मेरे वतन' हा नवा कोरा चित्रपट २१ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा नवा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट उषा मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे. उषा यांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी रेडिओच्या माध्यमातून लोकांना इंग्रजांविरोधात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
वाचा: अरिजीत सिंहला पाहून रिंकूने असे काही केले की नेटकरीही झाले चकीत
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि हृतिक रोशन यांचा 'फायटर' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्यानंतर आता दीपिका आणि हृतिकचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. २१ मार्च रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट ज्यांनी थिएटरमध्ये पाहिला नाही त्यांना घरबसल्या पाहाता येणार आहे.
वाचा: किली पॉलला ‘गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ, गाणे गातानाचा मजेशीर व्हिडीओ केला शेअर
मामूटी आणि जयाराम यांचा मल्याळम चित्रपट 'अब्राहम ओजलर' बराच चर्चेत आहे. मामूटी यांचा हा चित्रपट २० मार्च रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक थ्रिलर अनुभव असणार आहे.
वाचा: सगळ्यांचे मनापासून आभार; 'चला हवा येऊ द्या' बंद होताच कुशल बद्रिके झाला भावूक
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'लाल सलाम' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत होता. आता हा चित्रपट २२ मार्च रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहाता येणार आहे.
संबंधित बातम्या