Bollywood Nostalgia : कोणताही चित्रपट बनवण्यासाठी आधी नायक, नायिका आणि खलनायकाला कास्ट केले जाते आणि मगच त्यावर काम सुरू होते. अभिनेत्री आणि एखाद्या व्हिलनशिवाय चित्रपट पाहण्यात तशी मजा येऊच शकत नाही. पण, आज आम्ही तुम्हाला अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये ना हिरोईन आहे ना खलनायक. तरीही, या चित्रपटाने असा चमत्कार केला की, त्याने विश्वविक्रम केला. चला जाणून घेऊया त्या चित्रपटाबद्दल आणि त्यातील नायकाबद्दल...
अभिनेता सुनील दत्त त्यांच्या दमदार अभिनय आणि आवाजासाठी ओळखले जात होते. नायक असो वा खलनायक, त्यांनी प्रत्येक भूमिकेत वर्चस्व गाजवले आणि प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडली. आपण त्यांच्या अशा चित्रपटाबद्दल बोलत आहोत, जो त्यांनी एकट्याने गाजवला होता. या चित्रपटाचे नाव होते 'यादें'. या चित्रपटाद्वारे सुनील दत्त यांनी दिग्दर्शक म्हणून देखील पदार्पण केले होते. मात्र, त्यांच्या या चित्रपटात खलनायक आणि नायिका देखील नव्हते. मग, काय होती या चित्रपटाची कथा, जी लोकांना इतकी आवडली की, या चित्रपटाचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले.
'यादें' हा चित्रपट १९६५ साली बनला होता, ज्यात केवळ एकच हिरो होता. कमीत कमी कलाकारांमुळे या चित्रपटाचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. या चित्रपटाची फिल्मफेअर पुरस्कारासाठीही निवड झाली होती. कृष्णधवल 'यादें' चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती सुनील दत्त यांनी केली होते.
हा चित्रपट एक अनोखा प्रयोग होता आणि हा चित्रपट त्या काळातील अतिशय प्रगत चित्रपट होता. ज्यामध्ये सुनील दत्तने एका काळजीत प्रेमळ पतीची भूमिका केली होती, जो एक दिवस कामावरून परत येतो आणि पत्नी आणि मुले घरी नसल्यामुळे अस्वस्थ होतो.
या चित्रपटात सुनील दत्त यांनी नर्गिस दत्त यांचा म्हणजेच त्यांच्या पत्नीचा फोटो पाहून अभिनय केला होता. या चित्रपटात केवळ नायिका आणि खलनायक नव्हते अस नाही तर, या चित्रपटात केवळ २ गाणी होती. ही गाणी लता मंगेशकर यांनी स्वतःच्या आवाजात गायली आहेत. या चित्रपटात कलाकारांची संख्या कमी होती, पण त्याची भरपाई वसंत देसाईंनी लिहिलेल्या दमदार संवादांनी केली.
संबंधित बातम्या