Neil Nitin Mukesh Birthday: बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश याला ओळखत नाही, असं क्वचितच कुणी असेल. वेगवेगळ्या चित्रपटात काम करून त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. पण, चाहत्यांना अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती नाही. आज अभिनेता नील नितीन मुकेश याचा वाढदिवस आहे. याच निमित्ताने आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल काही रंजक गोष्टी सांगणार आहोत. नीलच्या आयुष्याशी निगडीत एक भन्नाट किस्सा काही वर्षांपूर्वी चर्चेत आला होता. नील, दीपिका पदुकोणच्या घराबाहेर ३ तास गुलाब घेऊन उभा होता, हे त्याने स्वत: सांगितलं.
नील नितीन मुकेश आणि दीपिका पदुकोण यांनी २०१०मध्ये आलेल्या 'लफंगे परिंदे' या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यावेळी त्यांची मैत्री खूप घट्ट झाली होती. या दोन्ही स्टार्समध्ये काहीतरी गुलूगुलू सुरू असल्याचेही बोलले जात होते. दरम्यान, नील नितीन मुकेश याने एके दिवशी ट्विटरवर लिहिले की, 'मी काल तीन तास लाल गुलाब घेऊन दीपिकाच्या दाराबाहेर उभा राहिलो. त्यानंतर मला समजले की, ती आरक्षण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बाहेर गेली होती.' यावरून चाहत्यांनी दोघांची नावं जोडायला सुरुवात केली. मात्र, पुढे ते एकमेकांसोबत दिसणे बंद झाले आणि हे नाते तिथेच संपले.
नील नितीन मुकेश यांचे खरे नाव 'नील नितीन मुकेश चंद माथूर' हे फार कमी लोकांना माहिती आहे. 'गान कोकिळा' लता मंगेशकर यांनी अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगच्या नावावरून अभिनेत्याचे नाव ठेवले होते. 'जॉनी गद्दार' या चित्रपटातून या अभिनेत्याने इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.
नील नितीन मुकेशचे वडील नितीन मुकेश हे पार्श्वगायक आहेत. तर, त्याचे आजोबा मुकेश हे देखील एकेकाळी खूप प्रसिद्ध गायक होते. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मनोरंजन विश्व चांगलेच परिचित होते. लता मंगेशकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांना तो इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच ओळखत होता. बॉलिवूडसोबतच नीलने साऊथच्या चित्रपटांमध्येही हात आजमावला आहे. २००९पासून त्याने तमिळ चित्रपट 'कथ्थी' आणि 'न्यूयॉर्क', 'प्रेम रतन धन पायो', 'गोलमाल अगेन', 'साहो' आणि 'बायपास'सारख्या चित्रपटांमध्ये काम करून चाहत्यांची मने जिंकली आहेत.
संबंधित बातम्या