सध्या संपूर्ण देशात होळी हा सण धुमधडाक्यात साजरा करण्याची तयारी केली जात आहे. होळी हा सण विशेष करुन रंगांचा सण म्हणून ओळखला जातो. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत जवळपास सर्वजण आनंदाने होळी हा सण साजरा करतात. नुकताच लग्न करुन परदेशात गेलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीने देखील होळी साजरी केली आहे. तिने होळी साजरी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ही अभिनेत्री म्हणजे 'मन उधाण वाऱ्याचे' मालिकेतून घराघरात पोहोचलेली नेहा गद्रे आहे. तिने अभिनयासोबतच सौंदर्याने भूरळ घातली होती. या मालिकेने नेहाला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले होते. पण लग्न केल्यानंतर नेहाने इंडस्ट्रीला रामराम ठोकला आणि परदेशात स्थायिक झाली. आता नेहा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. तिने परदेशात होळी साजरी केल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा: हेमंत ढोमेचे खरे आडनाव तुम्हाला माहिती आहे का? स्वत: केला खुलासा
नेहाने ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेन शहरात आयोजित केलेल्या होळी पार्टीला हजेरी लावली. या पार्टीत नेहा, तिचा पती आणि त्यांचे काही मित्र-मैत्रिणी हजर होते. त्यांनी बॉलिवूड गाण्यांवर ठेका धरला होता. या व्हिडीओमध्ये नेहा रंगांची उधळ करताना दिसत आहे. तसेच ती गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर नेहाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओ कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
वाचा: मी त्यांना बाबा म्हणू शकत नाही; सिद्धार्थ चांदेकरची आईच्या दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया
नेहाने २ मार्च २०१९ साली ईशान बापटशी लग्न केले. ईशान हा ऑस्ट्रेलियात राहातो. त्यामुळे लग्नानंतर नेहाने चित्रपटसृ्ष्टीला रामराम ठोकला आणि परदेशात स्थायिक झाली. नेहाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर मन उधाण वाऱ्याचे, अजूनही चांद रात आहे या मालिकांमध्ये काम केले आहेत. तसेच तिने मोकळा श्वास, गडबडीत झाली या चित्रपटांमध्ये काम करणार आहे.