Neeyat Teaser: ‘डिटेक्टिव्ह मीरा राव’ बनून विद्या बालन उकलणार खुनाचे गूढ; 'नीयत'चा जबरदस्त टीझर रिलीज!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Neeyat Teaser: ‘डिटेक्टिव्ह मीरा राव’ बनून विद्या बालन उकलणार खुनाचे गूढ; 'नीयत'चा जबरदस्त टीझर रिलीज!

Neeyat Teaser: ‘डिटेक्टिव्ह मीरा राव’ बनून विद्या बालन उकलणार खुनाचे गूढ; 'नीयत'चा जबरदस्त टीझर रिलीज!

Published Jun 21, 2023 03:38 PM IST

Neeyat Teaser Out: ‘नीयत’ या या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन गुप्तहेर मीरा रावच्या भूमिकेत एका खुनाचे गूढ उकलताना दिसणार आहे.

Neeyat Teaser
Neeyat Teaser

Neeyat Teaser Out: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने नेहमीच असे चित्रपट केलेलं आहेत, ज्यात अभिनेत्रीचे पात्र कथेचे ‘नायक’ बनले आहे. 'डर्टी पिक्चर', 'कहानी' सारखे चित्रपट याचे उत्तम उदाहरण आहे. अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर आता विद्या बालन 'नीयत' या चित्रपटामधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे.

अनु मेनन दिग्दर्शित ‘नीयत’ हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. अभिनेत्री विद्या बालन या चित्रपटात गुप्तहेर मीरा रावच्या भूमिकेत दिसणार आहे, जी एका खुनाचे गूढ उकलताना दिसणार आहे. विद्या बालन हिने नुकताच आपल्या या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. विद्या बालनच्या चित्रपटाचा हा धमाकेदार टीझर पाहून चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चित्रपटाच्या रिलीजची आता आणखी वाट बघू शकत नाही, अशी प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या (२१ जून) प्रदर्शित होणार आहे.

व्हॉईसओव्हरने सुरू होणाऱ्या या चित्रपटाचा टीझर विद्या बालनने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘नीयत’ या चित्रपटाच्या टीझरच्या व्हॉईसओव्हरमध्ये ऐकू येते की, ‘संशयित येत आहेत. हेतू बांधले जात आहेत. मित्रांनो तयार राहा, एक रहस्य येत आहे.’ या टीझरवरून लक्षात येते की, चित्रपटाची कथा खूनाच्या रहस्याभोवती फिरते. मात्र, खरा खुनी कोण? हे पाहणे खूप मनोरंजक असणार आहे.

यासोबतच मर्डर मिस्ट्रीच्या टीझरमध्ये विद्या बालनचा गुप्तहेर म्हणून फर्स्ट लूकही समोर आला आहे. ‘नीयत'चा टीझर अनेकांना आवडला आहे. मात्र, विद्या बालनचा लूक पाहून काही चाहत्यांनी हा चित्रपट 'नाईव्ह्ज आऊट' या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असल्याचा अंदाज बांधला आहे. ‘नीयत’ चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. विद्या बालनशिवाय राम कपूर आणि राहुल बोस यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात दिसणार आहे. ‘नीयत’ हा चित्रपट ७ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Whats_app_banner