Neetu Singh Koffee With Karan 8: बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण ८’मध्ये आता अभिनेत्री नीतू सिंह-कपूर आणि झीनत अमान या दोघी हजेरी लावणार आहेत. बॉलिवूडच्या या मैत्रिणींची जोडी आता करण जोहरसोबत कॉफी पिताना अनेक मोठे खुलासे करणार आहे. याच भागात करण जोहर नीतू सिंह-कपूर यांना अभिनेत्री जया बच्चन यांच्याबद्दल एक प्रश्न विचारताना दिसणार आहे. या दरम्यान नीतू सिंह देखील एक मोठा खुलासा करणार आहेत.
जया बच्चन आणि पापाराझींच नातं आता सर्वश्रुत आहे. जया बच्चन नेहमीच मीडियावर ओरडताना दिसतात. या संदर्भातच आता एक प्रश्न करण जोहर नीतू सिंह-कपूर यांना विचारणार आहे. करण जोहर, झीनत अमान आणि नीतू सिंह यांच्या गप्पांमध्ये जया बच्चन यांचा विषय निघताच सगळ्यांना त्यांच्या पापाराझींवर ओरडण्याचा किस्सा आठवणार आहे. यावेळी चर्चेत नीतू कपूर म्हणणार आहेत की, ‘जया बच्चन असं मुद्दाम वागतात. त्यांचा हाच अंदाज माध्यमांना देखील आवडतो.’
जया बच्चन आणि माध्यमांच्या या नात्याबद्दल बोलताना नीतू सिंह-कपूर करण जोहरला म्हणतात की, ‘मला वाटतं जया बच्चन असं मुद्दाम वागतात. असं त्यांनी आधी एकदा केलं होतं. म्हणून त्या आता परत परत करत असाव्यात. नाहीतर प्रत्यक्ष आयुष्यात त्या अशा नाही. त्या खूप गोड स्वभावाच्या आहेत. मला वाटतं की, पापाराझीच त्यांना घाबरतात. कारण त्या येताच म्हणतात की, आता बस करा. मला वाटतं त्या स्वतःच या सगळ्या गोष्टी आता एन्जॉय करत आहेत.’
पुढे नीतू सिंह-कपूर म्हणाल्या की, ‘मला वाटत की, त्यांना यात आता मजा वाटते, तर लोकांना देखील हे आवडत. त्यांची आणि माध्यमांची मिलीभगत असावी ही...’ यावेळी नीतू सिंह-कपूर यांचं हे बोलणं ऐकून चांगलाच हशा पिकला होता. यावेळी बॉलिवूडचा पडदा गाजवणाऱ्या दोन दिग्गज अभिनेत्री एकत्र करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ८’मध्ये सहभागी होणार आहेत. या निमित्ताने बॉलिवूडच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.
संबंधित बातम्या