एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणजे नीतू कपूर. त्यांचा प्रत्येक चित्रपट तुफान हिट ठरला होता. आज ८ जुलै रोजी नीतू कपूर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या खासगी आयुष्याविषयी काही खास गोष्टी...
बॉलिवूडमधील ‘ऑल टाईम हीट’ जोडी म्हणून दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि नितू कपूर ओळखले जायचे. त्यांची 'जेहरीला इन्सान' या चित्रपटाच्या सेटवर ओळख झाली होती. हळूहळू त्यांच्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. पण एक वेळ अशी होती की दोघेही एकमेकांचे तोंड पाहात नव्हते. एका चित्रपटाचे शुटिंग सुरु असताना दोघांचा ब्रेकअप झाला होता.
वाचा: अनंत अंबानीच्या संगीत सोहळ्यात सलमान खानचा स्वॅग, पाहा व्हिडीओ
नीतू कपूर यांनी वयाच्या १४व्या वर्षी ऋषी कपूर यांच्यासोबत काम केले. सुरुवातीला त्या दोघांमघ्ये खूप चांगली मैत्री होती. प्रत्येक नात्यात जसे रुसवे फुगवे असतात तसेच नीतू आणि ऋषी कपूर यांच्या नात्यातही आले होते. नीतू कपूर यांनी स्वत: या आठवणी काही मुलाखतींमध्ये जाग्या केल्या आहेत. ‘झूठा ही सही’ चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी घडलेला हा किस्सा आहे. नीतू आणि ऋषी एकमेकांचे तोंडही या चित्रपटाच्या सेटवर पाहात नव्हते. पण या सगळ्यामुळे नीतू कपूर यांची रडून रडून वाईट अवस्था झाली होती.
एका मुलाखतीमध्ये ऋषी कपूर यांनी याविषयी सांगितले होते. “झूठा कहीं का या सिनेमातील आमच्या गाण्याचं शूटिंग सुरु होते तेव्हा आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो. आमचंे भांडण झाले होते. हे गाणे शूट करण्यासाठी चार दिवस लागले. मात्र एकही दिवस आम्ही एकमेकांशी बोललो नाही. जर तुम्ही हे गाणे पाहिले तर तुमच्या ते लक्षातही येणार नाही. तुम्हाला वाटेल दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत” असे ऋषी कपूर म्हणाले होते.
वाचा: कालीन भैय्या सर्वात महाग! 'मिर्झापूर'साठी कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतले?
'झूठा कहीं चित्रपटातील गाण्यामध्ये आम्ही डान्स करताना आणि आनंदी असल्याचे दिसत आहोत. पण त्यावेळी आमचा ब्रेकअप झाला होता. मी मेकअप रुममध्ये एकीकडे रडत होते आणि दुसरीकडे डॉक्टर मला इंजेक्शन देत होते’ असे नीतू म्हणाल्या होत्या.
वाचा: अशोक सराफ आणि माधव अभ्यंकरची होणार टक्कर, 'लाईफलाईन' सिनेमातील अण्णांचा लूक व्हायरल
‘जेहरीला इन्सान’ या चित्रपटाच्या वेळी नितू कपूर आणि ऋषी कपूर यांची ओळख झाली. त्यानंतर १९८० साली त्यांनी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. मात्र ऐन लग्नात नितू आणि ऋषी कपूर बेशुद्ध पडले होते.
संबंधित बातम्या