Anant Ambani Wedding Video: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तो राधिका मर्चंडशी लग्न करणार आहे. सध्या त्यांचे प्री-वेडींग सेलिब्रेशन सुरु आहे. या सेलिब्रेशनला अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. तसेच जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती, राजकीय नेते या कार्यक्रमाला हजर असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी पत्नी नीतासोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
अनंतच्या प्रीवेडींग फंकशनमधील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी पत्नी नीतासोबत 'प्यार हुआ इकरार हुआ है...' या गाण्यावर रोमँटिक अंदाजात डान्स करताना दिसले. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
वाचा: ‘महाराष्ट्राची हास्याजत्रा’मधून सई ताम्हणकरही झाली गायब! अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चांना उधाण
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, मुकेश आणि नीता अंबानी दिग्गज अभिनेते राज कपूर आणि नर्गिस यांच्यावर चित्रित केलेल्या 'प्यार हुआ इकरार हुआ है' गाण्यावर नाचताना दिसत आहेत. जरी हा व्हिडिओ आधीच शूट केला गेला होता, जो प्री-वेडिंगमध्ये दाखवला होता.
शुक्रवार पासून गुजरातमधील जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. हा विवाहपूर्व कार्यक्रम रिलायन्स ग्रीन्स कॉम्प्लेक्स, जामनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
अनंतच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत. अभिनेता शाहरुख खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, राणी मुखर्जी, करीना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूर, सारा अली खान, गायिका रिहाना यांची उपस्थिती पाहायला मिळाली.