मुंबईतील बीकेसी येथे उभारण्यात आलेल्या नीता अंबानी कल्चरल सेंटरला नुकताच एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने तिथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी स्वत: नीता अंबानी यांनी साभांळली होती. या कार्यक्रमाची सुरुवात करताना नीता अंबानी यांनी मराठीतून संवाद साधला.'नमस्कार मंडळी कसे आहात?' असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमातील सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नीता अंबानी या झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
नीता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये ‘अजय-अतुल लाइव्ह’ हा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्राच्या या लाडक्या जोडीचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नीता अंबानी यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरल्याचे दिसत आहे. तसेच याच शोदरम्या नीता अंबानी यांनी मराठीतून देखील संवाद साधत सर्वांची मने जिंकली आहेत. त्यांचा हा मराठमोळा अंदाज सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
वाचा: छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय; निवडणूक प्रचारात अपमान झाल्यानं किरण माने भडकले, म्हणाले…
'तुम्ही आहात म्हणूनच या सर्व कला जिवंत आहेत, तुम्ही आहात म्हणून भारतीय संस्कृतीचा वारसा जिवंत आहे आणि तुम्ही आहात म्हणूनच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आहे' असे नीता अंबानी मराठीमध्ये बोलल्या. तसेच त्यावेळी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांचे नीता अंबानी यांनी आभार मानले आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात आणि संवाद हे नीता अंबानी यांनी मराठीतून केल्याने सर्वांना आणखी आनंद होत आहे. दरम्यान, नीता अंबानी यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तसेच त्यांनी यावेळी अजय-अतुल यांचे आभार देखील व्यक्त केल आहेत.
वाचा: वसु आकाशला आपल्या आयुष्यात जागा देऊ शकेल का? 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिका वेगळ्या वळणावर
नीता अंबानी या कायमच ग्लॅमरस अंदाजात दिसतात. त्या त्यांच्या महागड्या कपड्यांनी, ज्वेलरीने सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. नुकाताच पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांनी जांभळ्या रंगाची पैठणी नेसली आहे. केसात गजरा, गळ्यात ज्वेलरी, हातात बांगड्या या लूकमध्ये नीता अंबानी अतिशय सुंदर दिसत आहेत.
वाचा: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागरने पत्र लिहून मागितली मुक्ताची माफी, काय असेल आता तिचे पुढचे पाऊल? वाचा